फोनमधील Conatcs डिलिट झाले आहेत? 'या' सोप्प्या पद्धतीने करा रिस्टोर

तुमच्या स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्स चुकून डिलिट झाले असल्यास तर घाबरु नका. कारण हे कॉन्टॅक्स तुम्ही अगदी सहज पुन्हा रिस्टोर करु शकता. दरम्यान ही सुविधा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

तुमच्या स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्स चुकून डिलिट झाले असल्यास तर घाबरु नका. कारण हे कॉन्टॅक्स तुम्ही अगदी सहज पुन्हा रिस्टोर करु शकता. दरम्यान ही सुविधा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. तर गुगलच्या अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आधारित स्मार्टफोनमध्ये कॉन्टॅक्ट हे क्लाउटवर स्टोरेज करण्याची सुविधा मिळते. अशातच गुगल तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्स वेळोवेळी आपल्या स्टोरेजमध्ये स्टोर करत जातो.(ऐकावे ते नवलच! WeChat वर नाकात बोटे घालणे, ओठावरून जीभ फिरवणे, डोक्यावर अंडरवेअर घालण्यास बंदी; Tencent ने जारी केले नियम)

जर तुमची कॉन्टॅक्स लिस्ट मधून एखादा क्रमांक डिलिट झाला असेल तरी सुद्धा तो रिस्टोर करता येतो. तर जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे. तर खाली दिलेल्या काही सोप्प्या स्टेप्सचा वापर करुन तुम्ही कॉन्टॅक्स पुन्हा एकदा मिळवू शकता.(Tecno Spark 7T भारतात लॉन्च; Amazon India वर 'या' तारखेपासून सुरु होणार ऑनलाईन सेल)

-अॅन्ड्रॉइड फोनमधून डिलिटेड कॉन्टॅक्ट रिस्टोर करण्यासाठी फोनमध्ये Google Contacts अॅप प्री-इंस्टॉल असावे.

-सर्वात प्रथम कॉन्टॅक्स रिकव्हर करण्यासाठी Google Contacts अॅप सुरु करा.

-त्यानंतर टॉप राइट कॉर्नरच्या येथे असलेल्या हॅम्बर्गर मेन्यूवर क्लिक केल्यानंतर सेटिंग्सच्या ऑप्शनमध्ये जा.

-आता स्क्रिन खाली स्क्रोल केल्यावर मॅनेज कॉन्टॅक्सच्या आतमध्ये Undo Change ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

-येथे तुम्हाला गुगल अकाउंट निवडावे लागणार आहे. जिथे तुम्हाला कॉन्टॅक्स रिस्टोर करायचे आहेत.

-आता एक डॉयलॉग बॉक्स सुरु होईल त्यात वेळ निवडावी लागेल. त्यानुसार तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत कॉन्टॅक्स रिस्टोर करायचे आहेत ते सांगावे लागणार आहे.

-नंतर Confrim बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचे कॉन्टॅक्स रिस्टोर होतील.

फोनशिवाय अॅपच्या मदतीने कंप्युटर किंवा लॅपटॉपच्या वेब ब्राउजरच्या मदतीने रिस्टोर करु शकता. यासाठी तुम्हाला https://contacts.google.com वर जाऊन कॉन्टॅक्स रिस्टोर करावे लागतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now