स्मार्टफोनमध्ये Storage ची समस्या उद्भवतेय? 'या' पद्धतीने वाढवा स्पेस
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीसह स्मार्टफोन सुद्धा व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. बहुतांश लोक स्मार्टफोनचा वापर विविध कारणांसाठी करतात हे खरे. पण फोनमधील स्टोरेज आणि रॅम या दोन गोष्टी फार महत्वाच्या गोष्टी आहेत.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीसह स्मार्टफोन सुद्धा व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. बहुतांश लोक स्मार्टफोनचा वापर विविध कारणांसाठी करतात हे खरे. पण फोनमधील स्टोरेज आणि रॅम या दोन गोष्टी फार महत्वाच्या गोष्टी आहेत. जर तुम्ही पाहिले असल्यास ज्या वेळेस तुम्हाला एखादा फोटो किंवा व्हिडिओ शूट करायचा असल्यास त्यावेळी तुम्हाला स्टोरेज कमी असल्याचा अलर्ट दाखवला जातो. स्मार्टफोनमध्ये स्टोरेजच्या कमतरतेमुळे काही गोष्टी डाऊनलोड सुद्धा करता येत नाहीत. यावेळी तुम्ही काय कराल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला स्मार्टफोन मधील स्टोरेजी समस्या दूर करण्यासाठी पुढील काही पद्धतीचा वापर करुन स्पेस वाढवता येणार आहे.(वनप्लस 8 5G स्मार्टफोन सेल आज दुपारी 12 पासून सुरु; Amazon India आणि OnePlus.in वर उपलब्ध)
-फोनमधील स्टोरेजची समस्या दूर करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन कंप्युटरला जोडून त्यामधील फाईल्स डिलिट करु शकता. त्यामुळे स्पेस तयार होईल पण काही वेळेस लगेच स्टोरेज कमी करण्याची गरज पडते. त्यामुळे प्रत्येकवेळी तुमच्याकडे कंप्युटर असेलच असे नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणते अॅप आहेत जे खासकरुन अधिक स्पेस व्यापत आहेत ते पहा.
-जर तुमच्याकडे अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन आहे तर त्यामधील सेटिंग्समध्ये जाऊन कॅशे क्लिकर करा. त्यामुळे फोनचा स्टोरेज वाढला जाईल. जे अॅप तुम्हाला गरजेचे नाहीत ते तु्म्ही डिलिट करु शकता. असे करुन सुद्धा तुम्ही फोनमधील स्टोरेज वाढवू शकता.
-जर तुम्ही आयफोन युजर्स आहात तर Settings मध्ये जाऊन General येथे क्लिक करा. त्यानंतर स्टोरेज आणि आयक्लाउट स्टोरेजवर क्लिक करा. आता Main Storage येथे जावे. येथे फोनसाठी देण्यात आलेला स्टोरेज आणि त्याचे डिव्हिजन पाहता येणार आहे. त्यानुसार तुम्हाला फाईल्स पाहून त्या डिलिट करता येणार आहेत.
-काही वेळेस आपण ईमेल संबंधित काही फाईल्स सुद्धा डाऊनलोड केल्याने त्या Save होतात. या फाईल्स ही मोबाईल मधील स्पेस व्यापतात. त्यामुळे त्या सुद्धा तुम्ही नको असल्यास डिलिट करु शकता.(Whatsapp Tricks: कोणाचाही Whatsapp Status Seen न केल्याशिवाय कसा पाहावा, जाणून घ्या 'ही' सोप्पी ट्रिक)
जर तुम्ही स्मार्टफोनमधील नको असलेल्या फाईल्स, अॅप काढून टाकले तरीही स्टोरेज कमी दाखवत आहे. त्यावेळी तुम्ही मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ आणि अन्य कामाच्या गोष्टी त्या क्लाउड मधील स्टोरेजमध्ये सेव्ह करु शकता. कोणताही डेटा Archive करण्यासाठी Cloud Storage उत्तम ऑप्शन आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)