Instagram वर ब्लू टीक मिळविण्यासाठी सोप्या '8' स्टेप्स !
सेलिब्रेटींप्रमाणे तुमच्या इंस्टा अकाऊंटवर ब्लू टिक कशी मिळवायची ठाऊक आहे? या आहेत सोप्या टिप्स....
सोशल मीडियावर ब्लू टिक असलेले अकाऊंट वेरिफाईड असल्याचे समजले जाते. सेलिब्रेटींची खरी अकाऊंट्स त्यावरुनच ओळखता येतात. सेलिब्रेटींप्रमाणे तुमच्या इंस्टा अकाऊंटवर ब्लू टीक कशी मिळवायची ठाऊक आहे? Instagram वर फॉलोअर्स असे वाढवा
गेल्या काही दिवसांपासून फेसबूकवर हजारो युजर्सचे अकाऊंट हॅक झाल्याने लॉक करण्यात आले आहे. म्हणूनच इंस्टाग्रामने युजर्सचे अकाऊंट सुरक्षित राहण्यासाठी नवी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे तुम्हीही अगदी सहज सोप्या पद्धतीने इंस्टा अकाऊंटवर ब्लू टीक मिळवू शकता.
वेरिफाईड ब्लू टीक कशी मिळवाल?
इंस्टाग्रामवर उपलब्ध असलेल्या फॉर्मवर डिटेल्स भरल्यास त्यातून तुमच्या अकाऊंटची पडताळणी केली जाईल. या पडताळणीत तुमची माहिती सत्य आहे, हे पटल्यास तुमच्या अकाऊंटला देखील ब्लू टीक मिळू शकेल. मात्र त्यासाठी तुम्हाला फॉर्मसोबत सरकारकमान्य आयडी पुफ्र द्यावं लागेल.
# इंस्टाग्रामवर ब्लू टीक मिळविण्यासाठी स्मार्टफोनमधील अॅपवर लॉगइन करा. (पहिल्यांदा करत असाल तर) इंस्टाग्राम स्मार्टफोनमध्ये ओपन करा.
# त्यानंतर अॅपमध्ये उजव्या बाजूला खाली दिलेल्या आयकॉनवर टॅप करा.
# आता सर्वात वर उजव्या बाजुला असणाऱ्या तीन लाईन्सवर टॅप करा.
# त्यानंतर त्यात तुम्हाला सेटिंग्सचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
# ओपन झालेल्या मेन्यूमध्ये खाली स्क्रोल केल्यास रिक्वेस्ट वेरिफिकेशनचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
# त्या ऑप्शनवर टॅप करताच एक फॉर्म दिसेल. फॉर्ममध्ये विचारलेली खाजगी माहिती भरा आणि ड्रॉप डाऊन मेन्यूमधून तुमचे प्रोफेशन निवडा.
# त्यानंतर सरकारमान्य आयडी प्रुप अपलोड करा आणि सेंड बटणावर क्लिक करा.
# टॅप केल्यावर इंस्टाग्रामवर तुमचे डॉक्युमेंट पडताळणीसाठी पाठवले जाईल. आणि त्यानंतर पडताळणी करुन तुमचे अकाऊंट वेरिफाईड होईल व त्यावर ब्लू टीक येईल.