WhatsApp Fingerprint Lock Feature: अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये आता व्हॉट्सअॅप 'फिंगर प्रिंट लॉक' फीचर कसं वापराल?
फिंगर प्रिंट लॉक ही सुविधा केवळ आयफोन युजर्सना देण्यात आली होती. पण आता कंपनीकडून आयफोनप्रमाणेच अॅन्ड्रॉईड युजर्सलादेखील फिंगर प्रिंट स्नॅकरचा पर्याय दिला आहे.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आता जगभरात प्रामुख्याने वापरलंजातं. केवळ टेक्स्ट मेसेज नव्हे तर अगदी लाईव्ह लोकेशनदेखील शेअर केलं जातं. आता युजर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअॅपने फिंगरप्रिंट लॉक (Fingerprint lock)हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिंगर प्रिंट सेन्सरच्या मदतीने अॅन्ड्रॉईड व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा देणार आहे. यापूर्वी फिंगर प्रिंट लॉक ही सुविधा केवळ आयफोन युजर्सना देण्यात आली होती. पण आता कंपनीकडून आयफोनप्रमाणेच अॅन्ड्रॉईड युजर्सलादेखील फिंगर प्रिंट स्नॅकरचा पर्याय दिला आहे. तर आयफोनच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये फेस आय डी फीचर देखील देण्यात आलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्सची सुरक्षा अधिक वाढली आहे.
फिंगर प्रिंट लॉक या फीचरच्या मदतीने तुम्हांलाही तुमचा फोन लॉक करायचा असेल तर अॅन्ड्रॉईड युजर्सला या काही सहज सोप्या टेस्ट फॉलो करणं गरजेचे आहे. मात्र फिंगर प्रिंट लॉकचा पर्याय तुम्हांला हवा असेल तर गूगल प्ले स्टोअर वरून तुम्हांला व्हॉट्सअॅप मेसेंजरचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करणं देखिल तितकंच गरजेचे आहे.
अॅन्ड्रॉईड फोनवर फिंगर प्रिंट लॉक सिक्युरिटी फिचर कसं मिळवाल?
1. तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर सेटिंगामध्ये जा. उजव्या बाजूला असलेल्या 3 उभ्या रेषांवर क्लिक करा.
2.सेटिंग्स ओपन केल्यानंतर युजर्सला 'Account' मध्ये Privacy वर क्लिक करणं आवश्यक आहे.
3. Privacy मध्ये गेल्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन केल्यानंटर तुम्हांला fingerprint lock feature चा पर्याय दिसेल.
4. आता हे फीचर उपलब्ध करून घेण्यासाठी टॉगल बटणवर क्लिक करा. याकरिता तुम्हांला फिंगरप्रिंट देऊन तुमची ओळख पटवून द्यावी लागेल.
5. तुम्हांला फिंगर प्रिंट लॉकचा पर्याय कधी आणि कसा हवा आहे? यासाठी 3 पर्याय मिळतात.
6.युजर्स 'show content in notification' सिलेक्ट करून प्रिव्ह्यू पाहू शकतात.
फिंगरप्रिंटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप लॉक असले तरीही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल यांना उत्तर देता येऊ शकते. या फीचरची सोय केवळ स्मार्टफोनसाठी असल्याने तुम्ही व्हॉट्सअॅप वेब नेहमीप्रमाणेच डेस्टटॉपवरही वापरलं जाऊ शकतं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)