फोटोज whatsApp stickers मध्ये कसे कन्वर्ट कराल? या आहेत 6 सोप्या स्टेप्स !

पण कसं? तर या आहेत सोप्या स्टेप्स....

व्हॉट्सअॅप स्टिकर्स (Photo Credits: Whatsapp Blog)

काही दिवसांपूर्वी इंस्टेट मेसेजिंग अॅप WhatsApp ने स्टिकर्सचे नवे फिचर सुरु केले. यामुळे तुम्ही आता WhatsApp वर स्टिकर्स पाठवू शकता. पण तुम्हाला ठाऊक आहे का? की तुम्ही तुमचा फोटो देखील स्टिकर्स रुपात कन्वर्ट करु शकता. पण कसं? तर या आहेत सोप्या स्टेप्स....

दोन स्टेप्स सर्वात महत्त्वाच्या आहेत. सर्वप्रथम तुम्ही ज्या फोटोला स्टीकर बनवू इच्छिता त्या फोटोला बॅकग्राऊंट नसावे. यासाठी तुम्हाला फोटो 'नो बॅकग्राऊंट इमेज'मध्ये कन्वर्ट करावा लागेल. त्यानंतर कन्वर्ट केलेला फोटो किंवा इमेज WhatsApp स्टिकर्सच्या लिस्टमध्ये अपलोट करा. त्याचबरोबर फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन किंवा 2.18 वा त्यावरील व्हर्जन इंस्टॉल असणे गरजेचे आहे.

त्यानंतरच्या या काही स्टेप्स-

# सर्वप्रथम फोनमधील ज्या फोटोचे स्टिकर बनवायचे आहे तो फोटो सिलेक्ट करा.

# त्यानंतर तो फोटो PNG फाईलमध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच त्याचे बॅकग्राऊंट रिमूव्ह करा.

# त्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोरवरुन बॅकग्राऊंट इरेजर अॅप डाऊनलोड करु शकता. मात्र वेरिफाईट अॅपचं इंस्टॉल करा.

# बॅकग्राऊंट इरेजर अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेला फोटो अपलोड करा आणि त्याचे बॅकग्राऊंट रिमूव्ह करुन PNG टाईप फाईल फॉर्मेटमध्ये सेव्ह करा.

# यानंतर पुन्हा गुगल प्ले स्टोरमध्ये जावून पर्सनल स्टिकर्स फॉर WhatsApp अॅपच्या लिस्टमध्ये वेरिफाईड अॅप डाऊनलोड करा.

# यानंतर या अॅपमध्ये जावून कन्वर्ट केलेला फोटो अपलोड करा. तुमचा फोटो स्टिकरमध्ये कन्वर्ट होईल. मग तुम्ही WhatsApp वरुन शेअर करु शकता.

या सोप्या स्टेप्सने तुम्ही हवे असलेले फोटोज whatsApp stickers मध्ये कन्वर्ट करु शकता.