WhatsApp ची जबरदस्त ट्रिक; अॅप ओपन करता जाणून घ्या कोण आहे ऑनलाईन

अशीच एक नवी ट्रिक जाणून घेऊया.

WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप. तरुणाई पासून अगदी जेष्ठांपर्यंत सर्वांना व्हॉट्सअॅपची भूरळ पडली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर चॅट करणे, स्टेटस अपडेट करणे, मेसेज फॉरवर्ड करणे हे उद्योग सुरुच असतात. व्हॉट्सअॅपच्या सातत्याने होत असलेल्या वापरामुळे त्याबद्दलच्या नवनव्या ट्रिक्स जाणून घेण्यासाठी युजर्स उत्सुक असतात. अशीच एक नवी ट्रिक जाणून घेऊया. या ट्रिकद्वारे तुम्हाला स्वत: ऑनलाईन न जाता तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोण कोण अॅक्टीव्ह आहे. हे कळू शकेल. (WhatsApp Carts Feature मुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वर शॉपिंगचा अनुभव होणार अधिक सुकर; पहा कसं वापराल हे फीचर)

यासाठी सर्वप्रथम गुगल वर जावून GBWhatsApp सर्च करा आणि समोर येणाऱ्या लिंकवरुन एपीके फाईल डाऊनलोड करा. त्यानंतर एपीके फाईल च्या माध्यमातून GBWhatsApp अॅप फोनमध्ये इंस्टॉल करा. त्यानंतर काही विशिष्ट सेटिंग्स करुन तुम्हाल ऑनलाईन न जाता कोण कोण ऑनलाईन आहे ते कळू शकेल. (2021 मध्ये 'या' स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp; पहा यादी, कदाचित तुमचा फोन तर नाही)

त्यासाठी काही स्टेप्स:

# GBWhatsApp अॅप डाऊनलोड केल्यानंतर सेटिंग्स मध्ये जा.

# तिथे तुम्हाला Main/Chat Screen चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

# Contact Online Toast चा पर्यायावर क्लिक करा.

# त्यानंतर ज्या व्यक्तीचे ऑनलाईन स्टेटस चेक करायचे आहे त्याच्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा.

# त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेला कॉन्टॅक्ट ऑनलाईन येईल तेव्हा तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल.

दरम्यान, व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवे फिचर्स लॉन्च करुन युजर्संना खूश करत असतं. व्हॉट्सअॅपवर म्यूट करण्यासाठी आतापर्यंत 3 पर्याय मिळत होते. 8 तास, 1 आठवडा आणि 1 वर्ष. परंतु, आता कंपनीने एक वर्षाऐवजी Always Mute फिचर लाईव्ह केले आहे. यामुळे तुम्हाला एका कॉन्टॅट नंबर किंवा ग्रुप प्रत्येक वर्षी म्यूट करावा लागणार नाही. तुम्ही नको असलेला ग्रुप किंवा कॉन्टॅट कायमस्वरुपी म्यूट करु शकता.