TRAI Rule: रिचार्जशिवाय Jio, Airtel, VI आणि BSNL SIM किती दिवस सुरू राहू शकते? काय आहे ट्रायचा नियम? जाणून घ्या
हा नियम Jio, Airtel, Vi आणि BSNL मधील सिम कार्डस् दीर्घकाळ रिचार्जशिवाय सक्रिय ठेवण्यासाठी आणण्यात आला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज टाळता येईल. तसेच रिचार्जवरील खर्च कमी करता येईल. हे नवीन नियम सिम व्यवस्थापन सोपे करतात आणि वापरकर्त्यांना कार्यक्षमतेने रिचार्ज प्लॅन करण्यास मदत करतात
TRAI Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) सिम कार्ड वैधतेवर लक्ष केंद्रित करणारा एक नियम आणला आहे. हा नियम Jio, Airtel, Vi आणि BSNL मधील सिम कार्डस् दीर्घकाळ रिचार्जशिवाय सक्रिय ठेवण्यासाठी आणण्यात आला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज टाळता येईल. तसेच रिचार्जवरील खर्च कमी करता येईल.
Jio सिम वैधता नियम -
Jio वापरकर्त्यांसाठी, सिम कोणत्याही रिचार्जशिवाय 90 दिवस सक्रिय राहील. या कालावधीनंतर, रीअॅक्टिव्हेशन प्लॅनची आवश्यकता असेल. या 90 दिवसांमध्ये, इनकमिंग कॉल सुविधा बदलू शकतात. जसे की काही वापरकर्त्यांसाठी, ते एका महिन्यासाठी इनकमिंग मिळवू शकतात, काहींसाठी एका आठवड्यासाठी किंवा अगदी एका दिवसासाठी (त्यांच्या मागील/शेवटच्या रिचार्जवर अवलंबून) सुविधा उपलब्ध असेल. परंतु, 90 दिवस निष्क्रिय राहिल्यानंतरही, जर वापरकर्त्याने रिचार्ज करण्याचा पर्याय निवडला नाही, तर Jio सिम कायमचे डिस्कनेक्ट केले जाईल आणि दुसऱ्या कोणालातरी पुन्हा वाटप केले जाईल. (हेही वाचा - New SIM Card Rules: नवं सीम कार्ड घेताना आता आधार बेस्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य)
एअरटेल सिम वैधता नियम -
एअरटेल सिम कार्ड कोणत्याही रिचार्जशिवाय 60 दिवसांसाठी सक्रिय राहतील. या कालावधीनंतर, वापरकर्त्यांना त्यांचा नंबर चालू ठेवण्यासाठी (45 रुपयांच्या प्लॅनइतका कमी) किमान वैधता प्लॅन खरेदी करावा लागेल.
VI सिम वैधता नियम -
व्हीआय वापरकर्त्यांना त्यांचे सिम रिचार्ज न करता 90 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळेल. यानंतर, नंबरची सेवा टिकवून ठेवण्यासाठी 49 रुपयांचा प्लॅन सक्रिय करणे आवश्यक आहे. (Identity Theft Case In Mumbai: मुंबई मध्ये 99 सीम कार्ड्स अॅक्टिव्ह करण्यासाठी आधार कार्डचा गैरवापर; MHB Colony पोलिस स्टेशन मध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल )
BSNL कमाल वैधता -
सरकारी मालकीची बीएसएनएल भारतातील सर्वात जास्त वैधता कालावधी प्रदान करत आहे. बीएसएनएल सिम कोणत्याही रिचार्जशिवाय 180 दिवस सक्रिय राहील, ज्यामुळे वारंवार रिचार्ज टाळू इच्छिणाऱ्यांसाठी ते सर्वात चांगला पर्याय असेल.
हे नवीन नियम सिम व्यवस्थापन सोपे करतात आणि वापरकर्त्यांना कार्यक्षमतेने रिचार्ज प्लॅन करण्यास मदत करतात. दूरसंचार विभागाने (डीओटी) एअरटेल, जिओ, बीएसएनएल आणि व्होडाफोन आयडियासह प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सना विलंब न करता कॉलर नेम प्रेझेंटेशन (सीएनएपी) सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या हालचालीचा उद्देश बनावट कॉल्सना आळा घालणे आणि कॉल करणाऱ्याचे सत्यापित नाव प्राप्तकर्त्याच्या फोनवर प्रदर्शित करून वापरकर्त्याची सुरक्षितता वाढवणे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)