खुशखबर! गुढी पाडव्यानिमित्त मोबाईल्सवर भरघोस सूट; Apple iPhone XS, Motorola Razr 2019, Realme 5 Pro, Realme X2 Pro वर 36 हजारापर्यंत सवलत
महाराष्ट्रीय लोक हा दिवस नववर्ष म्हणूनही साजरा करतात. महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही हा खास दिवस खूप शुभ मानला जातो.
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संचारबंदी, तर दुसरीकडे गुढी पाडव्याची (Gudi Padwa 2020) तयारी चालू आहे. महाराष्ट्रीय लोक हा दिवस नववर्ष म्हणूनही साजरा करतात. महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही हा खास दिवस खूप शुभ मानला जातो. यादिवशी नवीन खरेदी केली जाते. काहीजण नवीन कार, बाईक, कपडे इत्यादी खरेदी करतात पण, सध्या टेक डिवाइसेसचे वेड असणारे लोक या दिवशी अनेक गॅजेट्सही खरेदी करताना दिसत आहेत. अशा सणासुदींच्या दिवशी अनेक गॅजेट्सवर विविध सवलती आणि ऑफर चालू असतात. त्यामध्ये फ्लिपकार्ट (Flipkart) स्मार्टफोन खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर देत आहे. त्यामुळे यंदा स्मार्टफोन खरेदीद्वारे तुम्ही गुढी पाडवा आणि उगादी आनंदात साजरी करू शकाल. चला जाणून घेऊया कोणत्या फोनवर काय आहे ऑफर
Apple iphone XS: 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनसाठी फ्लिपकार्टवर 36,000 ची ऑफर देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 एमपी मुख्य कॅमेरा आणि 12 एमपी दुय्यम शूटरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. इतर सवलतींमध्ये अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅकचा समावेश आहे.
Realme 5 Pro: Realme ने भारतामधील एक नंबरचा स्मार्टफोन ब्रँड असल्याचा दावा केला आहे. रिअलमी 5 प्रो वर सध्या 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच अॅक्सिस बँक, अॅक्सिस बँक बझ, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड्स 5 टक्के कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय देखील उपलब्ध आहे. या डिव्हाइसमध्ये 48 एमपी प्राइमरी कॅमेरा, एक 8 एमपी दुय्यम शुटर, दोन 2 एमपी मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे.
Realme X2 Pro: या फोनवर 2000 रुपयांपर्यंत ऑफर मिळत आहे. तसेच या फोनसाठी एक्सचेंज ऑफरवर 15,850 रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. इतर सवलतींमध्ये, फ्लिपकार्टवर Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के अमर्यादित कॅशबॅक, आयसीआयसीआय बँक क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे ईएमआयवर 5 टक्के सूट समाविष्ट आहे. (हेही वाचा: Vodafone-Idea ने 'Work From Home' करणा-यांसाठी आणले '3' नवे भन्नाट प्लान्स ज्यात दिवसा मिळेल 3GB डेटा)
Poco X2: 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज, 64 एमपी क्वाड कॅमेरा सेटअप, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 G SoC, 6.67 इंचाची एफएचडी + डिस्प्ले आणि 4,500 एमएएच बॅटरी अशी या फोनची वैशिष्ठ्ये आहेत. आयसीआयसीआय बँक क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे ईएमआयवर या फोनसाठी 5 टक्के सूट देण्यात आली आहे. तर फ्लिपकार्टवर यासाठी 2,000 रुपये सवलत मिळत आहे.
Motorola Razr 2019: नुकत्याच लॉन्च झालेल्या या फोनसाठी, फ्लिपकार्टवर 25,000 रुपये सूट, फ्लिपकार्ट Axis Bank क्रेडिट कार्ड्सवर 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. तसेच सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डवर 10 हजार कॅशबॅक देण्यात येत आहे. ड्युअल डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 16 एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो फोल्ड केल्यावर सेल्फी कॅमेराप्रमाणे कार्य करतो. यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 एमपी फ्रंट कॅमेरा देखील आहे.