शासकीय अधिकाऱ्यांसह 20 देशातील सैनिकांच्या WhatsApp ची झाली हेरगिरी: रिपोर्ट
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जगभरातील देशांची हेरगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, या वर्षाच्या सुरुवातीलाच हॅक करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने अमेरिकेसह अन्य देशांच्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली आहे.
सोशल मीडियातील जगप्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील व्हॉट्सअॅप च्या प्रायव्हसी बाबत आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जगभरातील देशांची हेरगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, या वर्षाच्या सुरुवातीलाच हॅक करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने अमेरिकेसह अन्य देशांच्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली आहे. मेसेजिंग कंपनीशी निगडित असलेल्या लोकांचे असे म्हणणे आहे की, युजर्सचा फोन हॅक करण्यासाठी Facebook Inc's WhatsApp चा उपयोग करण्यात आला होता.
व्हॉट्सअॅप संबंधित जोडलेल्या सुत्रांनी असे सांगितले आहे की, हॅकर्सच्या निशाण्यावर हाय प्रोफाइल सरकार आणि पाच महाबेठांवर वसलेले देशातील सैन्याचे अधिकारी आहेत. त्यांनी असे ही म्हटले यामध्ये अमेरिकेशी जोडलेले गेलेले काही मित्र देश सुद्धा सहभागी आहेत. दरम्यान मंगळवारीच व्हॉट्सअॅपच्या पॅरेंट कंपनी फेसबुककडून इज्राइलच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओवर हॅकिंग केल्याचा आरोप लावला आहे. त्यावर खटला दाखल ही करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅपवर स्पायवेअरच्या वाढत्या वादादरम्यान सुचना प्रौद्योगिकी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 2011 ते 2013 मधील तत्कालीन अर्थ मंत्री प्रणब मुखर्जी आणि जनरल वीके सिंह यांच्या विरोधात हेरगिरी करण्याच्या कथित प्रकरणी उत्तर मागितले आहे. तर व्हॉट्सअॅपला उत्तर देण्यासाठी 4 नोव्हेंबरचा वेळ देऊ केली आहे. कंपनीचा असा आरोप आहे की, हॅकर्सनी व्हॉट्सअॅपच्या सर्वरचा उपयोग करत 29 एप्रिल 2019 ते 10 मे 2019 दरम्यान 1400 व्हॉट्सअॅप युजर्सच्या मोबाईल फोनवर मालवेयरच्या माध्यमातून हल्ला केला. त्याच्याच माध्यमातून हेरगिरी करण्यात आली आहे. त्यामध्ये 20 देशांचे पत्रकार, शासकीय उच्चाधिकारी आणि मानवाधिकार अॅक्टिव्हिस्ट सुद्धा सहभागी आहेत.