Google Maps च्या मदतीने मित्रांना फॉलो करणे होणार सोपे, कंपनीने आणले नवे फिचर

परंतु येत्या काळात गुगल मॅप अधिक उत्तम बनवण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता कंपनीने एक धमाकेदार फिचर आणले असून त्याचा वापर करुन गुगल मॅपच्या सहाय्याने मित्रांना सोपे होणार आहे. मित्रांना फॉलो करण्यासह त्यांचे सल्ले आणि अपडेट्स सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहेत.

Google Maps | Representational Image | (Photo Credit Digitaltrends.com)

Google Maps आता सुद्धा नागरिकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु येत्या काळात गुगल मॅप अधिक उत्तम बनवण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता कंपनीने एक धमाकेदार फिचर आणले असून त्याचा वापर करुन गुगल मॅपच्या सहाय्याने मित्रांना सोपे होणार आहे. मित्रांना फॉलो करण्यासह त्यांचे सल्ले आणि अपडेट्स सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहेत. कंपनीने हे फिचर गेल्या वर्षात टेस्टिंगसाठी उपलब्ध केले होते. त्यानंतर आता ते ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीने त्यांच्या ब्लॉक पेजवर नव्या फिचर बाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, आम्ही गेल्या वर्षात एक फिचर झळकवले होते. जे लोकांना लोकल गाइड करण्यास मदत करण्याची परवानगी देते. यासाठी गुगल मॅपचा त्यांना वापर करता येत होता. परंतु आता हे फिचर जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

गुगल मॅपच्या या नव्या फिचर बाबत माहिती देत कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, याच्या मदतीने मित्र किंवा परिवाराला फॉलो करण्यासह सार्वजनिक ठिकाणचा अनुभव, फोटो किंवा रिव्हु सुद्धा शेअर करता येणार आहे. त्याचसोबत युजर्सला प्रोफाइलवर काही टॉपिक्स आणि फिल्टर्स सुद्धा वापरता येणार आहेत. या मॅपसाठी कंपनीने एक नवी सेटिंग सुद्धा तयार केली असून त्यामध्ये युजर्सला प्रोफाइल मॅनेज करता येणार आहे.(इंटरनेटशिवाय Google Map चा 'या' पद्धतीने करा वापर)

यापूर्वी सुद्धा गुगल मॅपने एक नवे फिचर लॉन्च केले होते. त्यानुसार इलेक्ट्रिक कार सुरु झाल्यानंतर चालकांना EV चार्जर्स शोधता येणार होते. याबाबतची माहिती एका रिपोर्ट मध्ये देण्यात आली होती. त्यामध्ये असे ही सांगण्यात आले होते की, हे नवे फिचर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार कार सपोर्टनुसार स्टेशन्सला फिल्टर करता येणार होते.

 गुगल मॅपच्या अजून एका नव्या  फीचरमुळे आता तुम्ही ऍप वरून प्रवासाचा रूट आणि वाहनासोबतच ट्रेनच्या वेळा आणि गर्दीचा सुद्धा अंदाज घेऊ शकणार आहात. त्यामुळं ट्रेन आणि बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे. प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे, काहीच जागा रिकामी आहेत, उभं राहण्याची जागा आहे, जागा नाहीये अशा चार पर्यायात उत्तर मिळेल. यांचा अंदाज घेऊन मग प्रवासी आपली यात्रा प्लॅन करू शकता.


संबंधित बातम्या