Shirley Temple Google Doodle: अमेरिकन गायक, डांसर शिरलेय टेम्प्ल यांना मानवंदना देण्यासाठी गूगलचं खास डूडल

Shirley Temple या वयाच्या 10व्या वर्षाच्या आधीच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या होत्या.

Google Doodle| Screengrab From Google Homepage

जगातलं आघाडीचं सर्च इंजिन गूगल (Google) ने आज खास डूडलच्या (Doodle) माध्यमातून अमेरिकन अभिनेत्री, डान्सर, सिंगर शिरलेय टेम्प्ल (Shirley Temple) ला मानवंदना दिली आहे. दरम्यान आजच्या दिवशी 2015 मध्ये सेंटा मॉनिका हिस्ट्री म्युझियम ने 'Love, Shirley Temple'या नावाने एका एक्झिबिशनची सुरूवात केली होती. शिरलेय टेम्प्ल ने कमी वयातच मोठं नाव कमावलं होतं.रूपेरी पडद्यापासून राजनितिक मंचांवर त्यांची उपस्थिती असे.

शिरलेय टेम्प्ल चा जन्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये 23 एप्रिल 1928 ला झाला. वयाच्या 10 व्या वर्षाच्या आधीच त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. अवघ्या 6 वर्षांच्या असताना त्यांनी अकॅडमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं. गालावर खळी, कुरळे केस अशा लूक्सच्या शिरलेय टेम्प्ल यांनी 'स्टॅन्डअप अ‍ॅन्ड चिअर' आणि 'ब्राईट आईज' सारख्या सिनेमांमध्ये काम केले होते. 22 व्या वर्षी त्या रिटायर होऊन जनसेवेला लागल्या. स्क्रीन एक्टर्स गिल्ड ने 2006 साली त्यांना लाईफटाईम अचिवमेंट पुरस्काराने गौरवलं आहे.

शिरलेय टेम्प्ल यांना 1969 साली संयुक्त राष्ट्र मध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राजनितिक कार्यकाळामध्ये त्या घाना मध्ये राजदूत आणि विदेश विभाग मध्ये प्रोटोकॉलच्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या होत्या. 1988 साली त्यांना विदेश सेवा अधिकारी बनवण्यात आले होते. एक बालकलाकार ते ब्रेस्ट कॅन्सर वर बोलणार्‍या शिरलेय टेम्प्ल यांचा जीवनप्रवास शानदार होता. गूगल कडून आज डूडलवर त्यांच्या 3 फोटोंचा समावेश करण्यात आला आहे.