Google कडून Login ID चोरणाऱ्या 'या' अॅपवर बंदी, लगेच बदला तुमच्या फेसबुकचा पासवर्ड
आता गुगने पुन्हा एकदा प्ले स्टोरवरील तीन खतरनाक अॅप हटविले आहेत. ही बंदी युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातली गेली आहे.
गुगलने नुकत्याच 150 हून अधिक धोकादायक अॅपवर बंदी घातली होती. आता गुगने पुन्हा एकदा प्ले स्टोरवरील तीन खतरनाक अॅप हटविले आहेत. ही बंदी युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातली गेली आहे. त्यामुळे असे अॅप तातडीने तुमच्या मोबाइल मधून डिलिट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी Google I/O मध्ये कंपनीने म्हटले की, आता 3 बिलियन अॅक्टिव्ह अॅन्ड्रॉइड डिवाइस आहे. धोकादायक अॅफ बॅन करत गुगल युजर्सला सुरक्षित ठेवू पाहतात. ज्या अॅपवर बंदी घातली गेली आहे ते युजर्सची खासगी माहिती चोरत होते.
Login With Facebook बटणाच्या माध्यमातून युदर्सला एखादी वेब सीरिज किंवा अॅपला लगेच ऑथेंटिकेट करण्यासाठी सोपे जात होते. यामुळे सर्विस व्यतिरिक्तच दुसरे युजरनेम आणि पासवर्ड तयार करण्याशिवाय ते वापरु शकत होते. या सर्विसचा वापर Spotify आणि Tinder कडून सुद्धा केला जात होता.(Online Shopping Sale Fraud: फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये मागवला मोबाईल, मात्र पार्सलमध्ये निघाला साबण)
मात्र सिक्युरिटी फर्म नुसार हे अॅप युजर्सचा लॉगिन आयडी चोरुन खासगी माहिती वापरत होते. आता Magic Photo Lab-Photo Editor, Blender Photo Editor-Easy Photo Background Editor आणि Pix Photo Motion Edit 2021 यांना प्लॅटफॉर्मवरुन बॅन करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा हे अॅप डाउनलोड केले असल्यास ते तातडीने फोनमधून डिलिट करा. या व्यतिरिक्त तुमच्या फेसबुक लॉगिनच्या डिटेल्समध्ये बदल करा. तुम्हाला एखादा फोटो एडिटिंग अॅप वापरायचा असेल तर तुम्ही कोणत्याही प्रसिद्ध अॅपला गुगल प्ले स्टोअवरुन डाउनलोड करु शकता.