केवळ Google 3D Animals नव्हे तर Bolo App ते YouTube वरील DIY #WithMe... बच्चेकंपनीचा 21 दिवस लॉकडाऊनचा काळ सत्कारणी लागेल 'या' Google Apps Features सोबत!
Google 3D Animals, Bolo App ते YouTube वरील DIY #WithMe लॉकडाऊनमध्ये मुलांच्या सुट्टीचा सदुपयोग करायला मदत करतील हे खास पर्याय
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसपासून स्वतः सुरक्षित ठेवण्यासाठी आता अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. याला भारत देश देखील अपवाद नाही. पण या सेल्फ क्वारंटीनमुळे घरातील आबालवृद्ध 24 तास घरात अडकून पडले आहेत. दरम्यान अशावेळेस कॉर्परेट जगात काम करणारे वर्क फ्रॉम होम च्या नादात वेळ मारून नेत आहेत पण घरात बच्चे कंपनीचा वावर असेल तर त्यांना सतत कशामध्ये तरी गुंतवून ठेवण्याचं मोठं आव्हान पालकांसमोर आहे. काही दिवसांपूर्वी Google 3D animals हे अनोखं फीचर गूगलने आणलं. त्यामुळे अनेकांचे मागील दिवस महाकाय रूपातील Tiger, Panda, Lion, Shark पहाण्यात गेला. त्याच्यासोबत फोटोसेशन करण्यात गेला. मात्र या अनोख्या फीचर प्रमाणेच गूगलने DIY videos,काही स्टोरी रिडिंग अॅप्स याबाबतची माहिती ट्वीट करत मुलांचा क्वारंटीन आणि social distancing पाळण्याचा काळ सत्कारणी लावण्याची पूर्ण सोय केली आहे. Google 3D Animals: 'या' Android आणि iOS स्मार्टफोन मध्ये Panda, Tiger, Lion, Shark, Penguin पाहू शकाल अगदी तुमच्या जवळ!
मुलांना या लॉकडाऊनच्या काळात सतत चांगल्या, उपयुक्त गोष्टींमध्ये गुंतवून कसं ठेवायचं? यासाठी काही खास पर्याय सूचवले आहेत. Bolo App मध्ये चिमुकल्यांसाठी अमर चित्र कथा, टींकल अशि लहान मुलांची कॉमिक बुक सीरीज आहे. तर जगातील काही म्युझियम आणि गॅलरींची घरबसल्या सफर देखील घडू शकते. सध्या जगात फिरायला जायचे तुमचे सारे प्लॅन ठप्प असतील पण घरबसल्या तुम्ही अनेक आर्ट अणि कल्चरच्या संबंधित गोष्टी शिकू शकता. पेटिंग्सच्या गॅलरींची व्हर्चुअल टूर करु शकता. सध्या मुलांना कशामध्ये गुंतवायचं असेल तर 'Do It Yourself' म्हणजेच DIY क्राफ्टचे पर्याय द्या. युट्युबवर #WithMe वर त्याचे अनेक पर्याय बघायला मिळू शकतात.
मुलांना गुंतवून ठेवण्याचे Google India ने सुचवलेले काही पर्याय
Field Trips
DIY Classroom
आजकाल लहान मुलांना मोबाईलमध्ये बिझी राहणं आवडतं. मात्र आता स्मार्टफोन तुम्ही मुलांच्या हातात देताना त्यांचा वेळ सत्कारणी कसा लागेल हे पाहून द्यायला शिका. तंत्रज्ञानाचा, स्मार्टफोन्सचा वापर सदुपयोग करायची हीच संधी आहे. मग मुलांना आगाऊ कार्टुन्स, हिंसक ऑनलाईन गेम्सचं व्यसन लागण्याआधीच मोबाईलचा वापर करून त्यांच्या ज्ञानामध्ये, क्रिएटीव्हिटीमध्ये कसा सकारात्मक बदल आणता येऊ शकतो याकडे बघा. आणि तुमच्या या शोधमोहिमेमध्ये गूगल तुम्हांला मदत करेलचं! मग क्वारंटीनच्या रूपाने एकत्र राहण्याची, मुलांच्या कायम जवळ राहण्याची मिळालेली संधी दवडू नका.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)