Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक्स सेल 26 डिसेंबरपासून सुरू; iPhone आणि Realme च्या स्मार्टफोनवर मिळणार 10 हजार रुपयांची सूट

तसेच ग्राहका एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ घेता येणार आहे.

iPhone and Realme smartphones (Photo Credits: Apple, Realme India)

Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल नुकताच संपला आहे. यानंतर आता फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल सुरू करणार आहे. फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये आयसीआयसीआय बँक कार्डधारकांना 10 टक्के सूट मिळणार आहे. तसेच ग्राहका एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ घेता येणार आहे. फ्लिपकार्टने यापूर्वीचं स्मार्टफोनच्या सर्व ऑफर्सचा खुलासा केला आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जे या सेलमध्ये कमी किंमतीत उपलब्ध असणार आहेत. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अनेक फोनवर 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

iPhone SE 2020 -

या सेलमध्ये iPhone SE 2020 स्मार्टफोन 32,999 रुपयांमध्ये मिळेल. यात 64 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. तथापि, या वर्षाच्या सुरूवातीस हा स्मार्टफोन 42,500 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. म्हणजे फ्लिपकार्ट तुम्हाला या फोनवर 9,501 रुपयांची सूट देत आहे. यासह फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे. जुन्या फोनच्या एक्सचेंजवर तुम्हाला 13,200 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. (हेही वाचा - World's Best-Selling 5G Device: तमाम कंपन्यांना मागे टाकून Apple चा iPhone 12 ठरला जगातील सर्वाधिक विकला जाणारा 5G डिव्हाइस)

Realme X3 SuperZoom -

फ्लिपकार्ट इलेक्ट्रोनिक सेलमध्ये तुम्हाला Realme X3 SuperZoom स्मार्टफोन खरेदीवर 4,000 रुपयांची सूट मिळू शकते. या फोनची किंमत 27,999 रुपये आहे. या सेलमध्ये तुम्हाला हा फोन 23,999 रुपयांना मिळेल. रियलमी एक्स 3 सुपरझूम फोनमध्ये 6.57 इंचाचा फुल एचडी + 120 हर्ट्ज डिस्प्ले, 64 एमपी क्वाड रियर कॅमेरा सेटअप, ड्युअल फ्रंट कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर, आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. (हेही वाचा - Vivo V20 (2021) स्मार्टफोन Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

iPhone 11 Pro -

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये आयफोन 11 प्रो चे 64 जीबी व्हेरिएंट 79,999 रुपयांना मिळत आहे. या आयफोनवर तुम्हाला 13,200 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळू शकते. बाजारात या आयफोनची किंमत 84,900 रुपये इतकी आहे. म्हणजे या आयफोनवर तुम्हाला 4,901 रुपयांची सूट मिळेल.