Flipkart आता केवळ 10 मिनिटांत वस्तूंची डिलिव्हरी करणार; तुमच्या शहरातही सुरू होणार का 'ही' सेवा? जाणून घ्या
यामुळे खरेदीदारांना बरीच सोय होणार आहे. ग्राहकांना त्यांच्या मालासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही.
Flipkart 10 Min Delivery: तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट (Flipkart) वरून खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरू करणार आहे. कंपनी ग्राहकांसाठी झटपट सेवा सुरू करणार आहे, ज्यामध्ये ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत वस्तू खरेदीदारांना दिली जाईल. फ्लिपकार्ट आता क्विक कॉमर्सचा भाग बनणार आहे. यामध्ये ग्राहकांपर्यंत अतिशय वेगाने वस्तू पोहोचवल्या जातील. या नवीन सेवेमुळे फ्लिपकार्ट इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि झेप्टो सारख्या प्लॅटफॉर्मला कठीण स्पर्धा देईल.
फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांच्या सोयीची खूप काळजी घेते. यामुळेच कंपनी यूजर्ससाठी सतत नवनवीन सेवा आणत आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर UPI सेवा सुरू केली. आता कंपनी ग्राहकांसाठी झटपट डिलिव्हरी सुरू करणार आहे. (हेही वाचा -Flipkart Launches UPI Services: फ्लिपकार्टने सुरू केली UPI सेवा; Google Pay आणि Paytm ला देणार टक्कर)
10 मिनिटांत डिलिव्हरी मिळणार -
एका अहवालानुसार, फ्लिपकार्टची मूळ कंपनी वॉलमार्ट येत्या एक-दोन महिन्यांत 10-15 मिनिटांत डिलिव्हरी सेवा सुरू करणार आहे. यामुळे खरेदीदारांना बरीच सोय होणार आहे. ग्राहकांना त्यांच्या मालासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. (हेही वाचा - Flipkart Jobs: खुशखबर! फेस्टीव्ह सिझनच्या आधी फ्लिपकार्ट देणार 1 लाखांहून अधिक जणांना नोकऱ्या; जाणून घ्या सविस्तर)
या शहरांमध्ये सुरू होणार सेवा -
वॉलमार्ट सुरुवातीला फक्त देशातील निवडक शहरांमध्ये त्वरित सेवा सुरू करेल. Flickart ची ही झटपट सेवा इतर ई-कॉमर्स कंपन्यांना कठीण स्पर्धा देऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात, फ्लिपकार्टची जलद सेवा कोलकाता, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, भुवनेश्वर, कोईम्बतूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, लखनौ, गुवाहाटी, लुधियाना, नागपूर, सिलीगुडी पुणे, पाटणा, रायपूर आणि विजयवाडा येथे सुरू केली जाऊ शकते.