1 जून पासून Flipkart वर सुरु होणार सेल, ग्राहकांना खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार

फ्लिपकार्टवरील हा सेल तीन दिवस म्हणजेच 1 ते 3 जून पर्यंत असणार आहे. या दरम्यान ICICI क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. सेलमध्ये टॅबलेट ते साउंटबार सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट दिली जाणार आहे.

Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर Flipkart Days सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवरील हा सेल तीन दिवस म्हणजेच 1 ते 3 जून पर्यंत असणार आहे. या दरम्यान ICICI क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. सेलमध्ये टॅबलेट ते साउंटबार सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट दिली जाणार आहे. तर सेलच्या वेळी ग्राहकांना अॅपल, ऑनर, सॅमसंग, लेनोवे, iBall आणि Alcatel सारख्या बेस्ट सेलिंग टॅबलेट्सची विक्री करण्यात येणार आहे. मोठ्या स्क्रिनवर युजर्सला व्हिडिओ पाहण्याची मजा घेता येणार आहे.

सेलमध्ये विविध ब्रँन्ड्सचे हेफोन्स आणि स्पीकर्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. ब्लूटूथ स्पीकर्सची किंमत 999 रुपयांपासून सुरु होणार आहे. तर रिअलमी आणि boAt सारख्या कंपन्यांच्या वायरलेस इअरबड्सची सुरुवाती किंमत 1499 रुपये असून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टच्या या शानदार सेलवेळी Acer, Dell, HP सारख्या कंपन्यांच्या लॅपटॉपची किंमत 15,990 रुपयांपासून सुरु होणार आहे. या लॅपटॉपवर 34 टक्क्यांपर्यंत सूट ग्राहकांना मिळणार आहे. त्याचसोबत दमदार फिचर्स असणारे गेमिंग लॅपटॉप सुद्धा खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.(iQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत) 

फ्लिपकार्ट सेलवेळी पॉवरबँक्सवर सुद्धा सूट देण्यात येणार आहे. 10,000mAh बॅटरी असणाऱ्या बेस्ट सेलिंग पॉवरबँकसाठी ग्राहकाला सुरुवाती किंमत 399 पासून खरेदी करता येणार आहे. तसेच 20,000mAh बॅटरी असणाऱ्या पॉवरबँकसाठी सुरुवाती किंमत 849 रुपये असणार आहे.