Flipkart Dussehra Specials सेलला सुरुवात, ग्राहकांना 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिस्काउंट

पण आता फ्लिपकार्टकडून आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Dusshera Special सेलचे आयोजन करण्यात आले असून तो आजपासून (11 ऑक्टोंबर) सुरु झाला आहे.

Flipkart (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

'फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे' सेल संपला आहे. पण आता फ्लिपकार्टकडून आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Dusshera Special सेलचे आयोजन करण्यात आले असून तो आजपासून (11 ऑक्टोंबर) सुरु झाला आहे. हा सेल येत्या 15 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. या दरम्या ग्राहकांना जवळजवळ सर्व स्मार्टफोनवर नो कॉस्ट EMI आणि 12 हजार रुपयांहून अधिकचा एक्सजेंच ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट आणि कॅशबॅक ही दिला जाणार आहे.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ग्राहकांना कोटक बँकेकडून 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचसोबत स्मार्टफोनच्या खरेदीवर मोबाइल प्रोटेक्शन स्किम सुद्धा मिळणार आहे. तर जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काउंट(Flipkart Big Billion Days Sale च्या शेवटच्या दिवशी iPhone 12 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी; पहा काय आहे ऑफर)

Infinix Smart 5A स्मार्टफोन 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर कोटक बँकेकडून 10 टक्के कॅशबॅक आणि डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचसोबत Axis बँकेकडून पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोन 243 रुपये प्रति महिना नो कॉस्ट EMI आणि 6400 रुपये एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6.52 इंचाचा डिस्प्ले दिला असून 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला गेला आहे.

Realme 8s 5G फोन फ्लिपकार्टवर 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये पाच टक्के कॅशबॅक आणि 15 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. त्याचसोबत फोनवर 3 हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंट ही दिला जाणार आहे. ऐवढेच नव्हे तर ग्राहकांना रिअलमी 8एस 5जी वर 15 हजारापर्यंतचा एक्सचेंज ऑफर आणि 3 हजार रुपयांचा नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येणार आहे.

तसेच OPPO F19s स्मार्टफोन हा 19,990 रुपयांत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यामध्ये 3 हजारांचा स्पेशल डिस्काउंट आणि Kotak बँकेकडून 10 टक्के सूट दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोन 3332 रुपये प्रति महिना नो कॉस्ट ईएमआय आणि 17,600 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास ओप्पो एफ19एस मध्ये 6.43 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यामध्ये 16MP चा फ्रंला कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तसेच फोन Snapdragon 662 प्रोसेसरवर काम करणार आहे.