Flipkart Big Diwali सेल मध्ये खरेदी करा 8 हजारांहून कमी किंमतीतील 'हे' दमदार स्मार्टफोन
हा सेल येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सेलमध्ये शाओमी ते रिअलम पर्यंतचे दमदार स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करु शकता.
फेस्टिव्ह सीजनमध्ये ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर शानदार Big Diwali Sale सुरु झाला आहे. हा सेल येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सेलमध्ये शाओमी ते रिअलम पर्यंतचे दमदार स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करु शकता. त्यामुळे फ्लिपकार्टवर सुरु असलेला सेल हा तुमच्या खिशाला परवडणार ही आहे आणि तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करण्याची सुद्धा उपलब्ध होणार आहे. तर जाणून घ्या Flipkart Big Diwali सेल मध्ये 8 हजारांहून कमी किंमतीतील कोणते स्मार्टफोन आहेत.(Portronics ने भारतात लॉन्च केले Bluetooth Receiver आणि Transmitter Adaptor, जाणून घ्या खासियत)
Gionee Max या स्मार्टफोनची किंमत 5499 रुपये आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा एचडी प्लस कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉलूशन 720X1560 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.6GHz चे ऑक्टा कोर Unisoc SC9863A प्रोसेसरसह 5,000mAh ची बॅटरी, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देणार आहे. तसेच स्टोरेज एसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येणार आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास युजर्सला Gionee Max मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. ज्यामध्ये 13MP चा प्रायमरी सेंसर आणि दुसरा bokeh लैस आहे.
Redmi 8a Dual स्मार्टफोन जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तो तुम्हाला 6299 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.22 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जो कॉर्निंग गोरिल्लाने कोटेड आहे. फोन Snapdragon 439 प्रोसेसरवर उतरवला आहे. यामध्ये देण्यात आलेला स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. अॅन्ड्रॉइड 9.0pie ओएस वर आधारित स्मार्टफोन पॉवर बॅकअपसाठी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी Redmi 8A Dual मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला गेला आहे. यामध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. फ्रंटला 8MP कॅमेरा आहे.(यंदाच्या Festive Sales ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद; दर मिनिटाला तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री)
POCO C3 स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित MIIUI 12 वर काम करणार आहे. या स्मार्टफोनध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले दिला गेला आहे. याची किंमत 7499 रुपये आहे. स्मार्टफोनचे रेज्यॉल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. त्याचसोबत डिवाइस ऑक्टा कोर MediaTek Helio G35 आणि 5,000mAh ची बॅटरी सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने लेटेस्ट हँडसेट Poco C3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 13MP मध्ये प्रायमरी सेंसर, 2MP मायक्रो लैंस आणि 2MP चे डेप्थ सेंसर दिला आहे. त्याचसोबत फोनच्या फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा आहे.