Flipkart Big Diwali Sale: दिवाळी सेलमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करता येणार 'हे' दमदार स्मार्टफोन
त्यानुसार येत्या 23 ऑक्टोंबर पासून हा सेल सुरु होणार आहे. यामध्ये ग्राहकांना Apple ते POCO पर्यंतच्या शिखाला परवडतील अशा स्मार्टफोनवर दमदार डिल्स आणि ऑफर्स मिळणार आहेत.
Flipkart Big Diwali Sale: दिवाळीचा सण पाहता फ्लिपकार्टकडून Big Diwali सेल घेऊन आला आहे. त्यानुसार येत्या 23 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहकांना Apple ते POCO पर्यंतच्या शिखाला परवडतील अशा स्मार्टफोनवर दमदार डिल्स आणि ऑफर्स मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी असणार आहे.(Flipkart Big Diwali Sale: यंदा फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 17 ऑक्टोबर पासून; पहा बॅंक ऑफर्स ते Mobiles, TV वर कशा असतील ऑफर्स)
Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनवर 10 टक्के डिस्काउंट आणि 4500 रुपयांची स्पेशल सूटसह खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोन 711 रुपयांच्या प्रति महिना नो-कॉस्ट EMI आणि 15,650 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. MediaTek Dimensity 800U प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी ही मिळणार आहे. ऐवढेच नव्हे तर युजर्सला स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरासह 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेअटअपचा सपोर्ट मिळणार आहे.
तसेच POCO F3 GT 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. MediaTek Dimensity 1200 आणि 5065mAh च्या बॅटरीपेक्षा कमी आहे. यामध्ये 64MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. तसेच 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या व्यतिरिक्त पोको एफ3 जीटी 5जी स्मार्टफोनवर SBI कडून 10 टकके सूट, 6000 रुपयांचा स्पेशल प्राइज डिस्काउंट आणि Axis बँकेकडून 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. स्मार्टफोन 992 प्रति महिना नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे.
Vivo X70 Pro हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.65 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, 50MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये 4450mAhची बॅटरी दिली आहे. लेटेस्ट ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास SBI च्या क्रेडिट कार्डचा वापर करुन 10 टक्के डिस्काउंट आणि 5000 रुपयांची सुद्धा सूट मिळणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना वीवो एक्स 70 प्रो वर 3916 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI आणि 17,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर ही मिळणार आहे.