Flipkart ची भन्नाट ऑफर! स्मार्टफोन खरेदीवर 12 महिन्यानंतर मिळणार 100% कॅशबॅक, त्यासाठी काय करावे लागेल?
मात्र त्यासाठी काही विशेष अटी घालण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही नवनवीन गोष्टी, ऑफर्स आणण्याच्या प्रयत्नात असते. जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स ठेवत असते. नुकतीच फ्लिपकार्टने एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. 'फ्लिपकार्ट स्मार्ट पॅक' (Flipkart Smart Pack) या सब्सक्रिप्शनवर आधारित ही ऑफर आहे. यात ग्राहकांना नव्या स्मार्टफोन खरेदी 12 महिन्यानंतर 100% मनीबॅक मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. मात्र त्यासाठी काही विशेष अटी घालण्यात आल्या आहेत. या ऑफर अंतर्गत 17 जानेवारीपासून 12 किंवा 18 महिन्यांचे स्मार्टपॅक सबस्क्रिप्शन (Subscription) घेता येणार आहे.
ग्राहक नवा स्मार्टफोन फ्लिपकार्ट अॅपवर मनी बॅक गॅरंटीसह खरेदी करु शकणार आहेत. ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना त्याची खरेदी किंमत द्यावी लागणार आहे. त्यानंतर 100 टक्के मनी बॅक गॅरंटी मिळण्यास पात्र ठरावे यासाठी स्मार्टपॅक अंतर्गत दरमहा विशिष्ट शुल्क ग्राहकांना भरावे लागणार आहे.हेदेखील वाचा- खुशखबर! Flipkart आता मराठी भाषेतही उपलब्ध, अन्य प्रादेशिक भाषांचाही समावेश
या सबस्क्रिप्शन सेवेअंतर्गत ग्राहकांना विविध प्रकारच्या स्मार्टफोनसह सोनीलिव्ह (Sonyliv), झी5 प्रिमियम (Zee 5 Primium), व्हुट सिलेक्ट (Voot Select), झोमॅटो प्रो (Zomato Pro) यांसारख्या स्ट्रिमिंगसेवा मिळणार असून त्यांचा महिन्याच्या शुल्कामध्येच समावेश असेल.युएस आणि युरोपच्या धर्तीवर अशा प्रकारची योजना भारतात (India) प्रथमच राबवली जात आहे.
फ्लिपकार्ट ग्राहकांना स्मार्टपॅक सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून वाजवी दरात स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना शिक्षण (Education), आरोग्यसेवा (Health Services) किंवा करमणूक (Entertainment) यांसारख्या महत्वपूर्ण सेवा सहजपणे मिळवता येतील.
काय असतील यासाठी महत्त्वाच्या अटी
फ्लिपकार्टने तयार केलेल्या या आफर अंतर्गत युझर्स मनी बॅकच्या (Money Back) टक्केवारीनुसार गोल्ड (Gold), सिल्व्हर (Silver) किंवा ब्राँझ पॅकस घेऊ शकतात. या कार्यक्रमानुसार ग्राहकांना त्यांच्या नवीन स्मार्टफोनची किंमत भरावी लागेल त्यानंतर ते इच्छित कालावधीचे स्मार्टपॅक निवडू शकतात. त्यानंतर युझर्स (Users) किंवा ग्राहकांना दरमहा एक ठराविक शुल्क भरावे लागेल, ते त्यांनी निवडलेल्या पॅकवर अवलंबून असेल. या पॅकची रेंज 399 रुपयांपासून सुरु होईल. स्मार्टपॅकचा कालावधी संपल्यानंतर ग्राहक त्यांनी खरेदी केलेला स्मार्टफोन फ्लिपकार्टकडे जमा करु शकतात. त्यानंतर मनी बॅकची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. मात्र हे मनी बॅक स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.