Facebook Users Data Leaked : 50 कोटींपेक्षा अधिक फेसबुक यूजर्स चा डाटा लीक, फोन क्रमांकसह इतरही माहिती सार्वजनिक
जगभरातील सुमारे 50 कोटींहून अधिक फेसबुक युजर्सचा डाटा (Facebook Data) लीक झाला आहे. या युजर्सचा ईमेल एट्रेस, फोन क्रमांक आणि इतरही काही खासगी माहिती लिक झाल्याचे वृत्त आहे.
फेसबुक (Facebook) वापरणाऱ्या युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. जगभरातील सुमारे 50 कोटींहून अधिक फेसबुक युजर्सचा डाटा (Facebook Data) लीक झाला आहे. या युजर्सचा ईमेल एट्रेस, फोन क्रमांक आणि इतरही काही खासगी माहिती लिक झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यात कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचाही समावेश आहे. झुकरबर्ग यांचा फोन क्रमांक लीक झाल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. डेटा लिक (Facebook Users Data Leaked) झाल्याच्या वृत्तावरुन युजर्सनी कंपनीला घेरले आहे. तर, कंपनीने म्हटले आहे की, हे वृत्त जुने आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सुमारे 50 कोटींहून अधिक फेसबुक यूजर्सचा खासगी डेटा हॅकर्सच्या हाती लागला आहे. 2019 मध्ये लीक झालेल्या या डेटामध्ये ईमेल अॅड्रेस, मोबाईल नंबर, बँक अकाऊंट यांसारखी माहिती आहे. हडसन रॉक साइबर क्राइम इंटेलिजेंस फर्मचे मुख्य अधिकारी एलोन गॅल यांनी शनिवारी ट्विट करुन सांगितले की, फेसबुकच्या 533,000,000 यूजर्सचा खासगी डेटा लीक झाला आहे. (हेही वाचा, Facebook and Instagram Removed Fake Accounts: फेसबुक ने जगभरात हजारो बनावट खाती हटविली; इन्स्टाग्रामनेही जवळपास 900 खाती केले डिलिट)
बिजनेस इनसायडरने दिलेल्या वृत्तानुसार लीक झालेल्या डेटा मधून फोन क्रमांकासह काही माहिती करंट करण्यात आली आहे. म्हणजेच जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुम्ही ज्या फोनमधून फेसबुक वापरत असता तो फोन क्रमांक लीक झाला आहे.
एलोन गॅल यांनी यूजर्सचा डेटा लीक झाल्याबद्दल फेसबुकवर टीका केली आहे. तसेच हा फेसबुकचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. सायबर क्राईम तज्ज्ञ आणि यूजर्सनी जेव्हा फेसबुक डेटा लीक झाल्याबाबत टीका केली तेव्हा कंपनीन म्हटले की, डेटा लीक झाल्याचे वृत्त जुने आहे. हा एक जुना रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट 2019 मध्ये आलेला आहे. फेसबुक प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला 2019 मध्येच याबाबत माहिती मिळाली होती. आम्ही गांभीर्याने तेव्हाच ही समस्या दूर केली.
फेसबुक यूजर्सचा डेटा लीक होण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही डेटा लीक झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. सन 2016 मध्ये एका ब्रिटीश कन्सल्टींग फर्म केम्ब्रिज अॅनेलिटीका ने राजकीय जाहिरातींसाठी लाखो फेसबुक यूजर्सची खासगी माहिती लीक केली होती. ज्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.