Facebook चा नवीन सुरक्षा फंडा, Instagram, Messengerच्या नव्या रुपासोबत करण्यात येणार हे बदल

F8 परिषदेत इंस्टाग्राम व मेसेंजर साठी सुरु करण्यात येणारे नवीन बदल सांगण्यात आले , सर्वांसाठी एक सुरक्षित सोशल माध्यम बनवून अधिक लोकांना व समुदायांना जोडणे हा यामागील हेतू आहे, असे सांगण्यात येते

Mark Zuckerberg (Photo Credits-Twitter)

फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) या प्रख्यात सोशल नेटवर्किंग साइट्सच्या सुरक्षेवर मागील काही दिवसात अनेक प्रश्न उभे राहिले होते, मात्र आमच्या युजर्सचा विश्वास हेच ध्येय आहे असे म्हणत फेसबुकचे सीईओ (Facebook CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zukerberg) याने नुकत्याच झालेल्या F8 परिषदेत या सोशल साइट्सच्या सिस्टीम मध्ये नवे बदल करणार असल्याची माहिती दिली.

फेसबूकने काही दिवसांआधी मेसेंजर या ऍपच्या रचनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ही नवीन बांधणी अधिक जलद व वापरण्यास सोप्पी असेल. तसेच  येत्या वर्षात वापरण्यासाठी उपलब्ध केली जाईल अशी माहिती मेसेंजरच्या डायरेक्टर, आशा शर्मा यांनी दिली. फेसबुक डेटा लीक सत्र सुरूच; कोट्यवधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक

फेसबुक तर्फे आणले जाणारे काही मुख्य बदल जाणून घेऊयात...

फेसबुक हा जवळपास 400 मिलियन लोकांना जोडणारा एक सोशल साइट्सच्या स्वरूपातील दुवा आहे. या सर्व युजर्सच्या सोयीसाठी हे नवे बदल आणले जाणार आहेत. यातील काही बदल हे तात्काळ बघायला मिळतील तर बिजनेस व कॉम्प्युटर अप्लिकेशनचा पर्याय येत्या वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.