Facebook कडून भारतीय युजर्ससाठी Profile Lock फिचर रोलआउट

प्रोफाइल लॉक (Profile Lock) असे या फिचरचे नाव असून युजर्सला याच्या मदतीने फेसबुर मधील फ्रेंडलिस्ट मध्ये असणाऱ्या मित्रमैत्रीणींव्यतिरिक्त अन्य कोणाला तुमची पोस्ट किंवा फोटोज पाहता येणार नाही आहेत.

फेसबुक (Photo Credits: ANI)

फेसबुक (Facebook) कंपनीने भारतीय युजर्ससाठी खासकरुन एक नवे फिचर रोलआउट केले आहे. प्रोफाइल लॉक  (Profile Lock) असे या फिचरचे नाव असून युजर्सला याच्या मदतीने फेसबुर मधील फ्रेंडलिस्ट मध्ये असणाऱ्या मित्रमैत्रीणींव्यतिरिक्त अन्य कोणाला तुमची पोस्ट किंवा फोटोज पाहता येणार नाही आहेत. तसेच तुम्ही शेअर केलेली पोस्ट फक्त मैत्रपरिवाराल दिसणार आहेत. फेसबुकने खासकरुन महिलांच्या बाबत सुरक्षितता लक्षात घेता प्रोफाइळ फिचर रोलआउट केले आहे. हे फिचर भारतीय युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहे. येत्या काही आठवड्यात हे फिचर्स सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कंपनीने प्रोफाईल लॉक फिचर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पिक्चर गार्ड नंतर जाहीर केले आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकने प्रोफाइल पिक्चरच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी गार्ड फिचर रोलआउट केले होते. या फिचरच्या मदतीने कोणत्याही युजर्सला अन्य दुसऱ्या युजर्सचा फोटो डाउनलोड किंवा शेअर करता येत नाही. प्रोफाइल लॉक फिचर सुद्धा युजर्सची प्रायव्हेसी आणि सेफ्टीसाठी सोशल मीडिया कंपनीकडून उचलण्यात आलेले पाउल आहे. प्रोफाइल लॉक फिचर युजर्सला सेटिंग्स ऑप्शन येथे जाऊन सुरु करता येणार आहे. त्यानंतर युजर्सच्या प्रोफाइलची माहिती किंवा पोस्ट फक्त मित्रमैत्रीणींनाच दिसणार आहे.(Facebook चे नवे फिचर रोलआउट, एकाच वेळी 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधता येणार)

प्रोफाइल लॉक फिचर सुरु केल्यानंतर कोणताही फेसबुक युजर्सला तुमचा प्रोफाइल फोटो दिसणार नाही आहे. तसेच प्रोफाइल संबंधित अन्य कोणतीही माहिती त्याला एक्सेस करता येणार नाही आहे. तसेच तुमच्या मित्रमैत्रींचे सुद्धा मित्रपरिवार तुमची प्रोफाइल मधील माहिती आणि फोटो पाहू शकणार नाही. फेसबुकने हे प्रोफाइल लॉक फिचर युजर्सच्या मागणीमुळे रोलआउट केले आहे.