चीनला दणका: आता Huawei च्या नवीन फोनमध्ये मिळणार नाहीत फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम
कोणतेही App हुवाई फोनमध्ये प्री-इन्स्टॉल केलेले मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चीनची कंपनी असलेल्या हुवाईच्या फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम प्री-इन्स्टॉल केलेले नसणार.
हुवाईच्या (Huawei) मागील विघ्ने संपायचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने चीनकडून होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या चोरीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. आता फेसबुकनेही चीनला मोठा दणका दिला आहे. फेसबुकने आता आपल्या कंपनीशी निगडीत असलेले कोणतेही App हुवाई फोनमध्ये प्री-इन्स्टॉल केलेले मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चीनची कंपनी असलेल्या हुवाईच्या फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम प्री-इन्स्टॉल केलेले नसणार. अमेरिकेकडून बंदी घातल्यानंतर, अमेरिकन कंपन्यांनी याआधीच हुवाईसोबत व्यवसाय करणे थांबवले आहे.
हुवाई कंपनी अमेरिकेत बनलेले भाग आणि सॉफ्टवेअर आपल्या फोनसाठी वापरू शकत नाही. आता फेसबुककडूनही कंपनीला मोठा झटका मिळाला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, जे ग्राहक आधीपासूनच हुवाईचे फोन वापरत आहेत ते यानंतरही तसेच वापरू शकतील. या ग्राहकांना अपडेट्सदेखील मिळत राहतील. मात्र नवीन हुवाईच्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना फेसबुक, वॉट्सएप आणि इन्स्टाग्रामसारखी Apps प्री-इंस्टॉल्ड मिळणार नाहीत. (हेही वाचा: अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित, ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; तंत्रज्ञानाची चोरी रोखण्यासाठी उचलले पाऊल)
आतापर्यंत हुवाईकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान Google नेही हुवाईचा अँड्रॉइड परवाना रद्द केला आहे. आता कंपनी नवीन स्मार्टफोनमध्ये Android OS वापरू शकत नाही. दरम्यान हुवाई कंपनी बऱ्याच काळापासून चीनी लष्करी किंवा सुरक्षा सेवांद्वारे गुप्तचर म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याआधी अमेरिकेचे तंत्रज्ञान चीनकडे जाऊ नये म्हणून, हुवाईवर बंदी घालण्यात आली होती. आता युरोपातील देशही अशाच प्रयत्नात आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2019 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

