Facebook ला जबर फटका, डेटा लीक प्रकरणी भरावा लागणार 5 अब्ज डॉलर्सचा भुर्दंड
फेसबुक या प्रसिद्ध सोशल मीडिया साईटला अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन या संस्थेतर्फे तब्बल ५ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे, 2017 साली झालेल्या केम्ब्रीज अनॅलिटीका डेटा लीक प्रकरणी या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने (America Federal Trade Commission) प्रसिद्ध सोशल मीडिया साईट फेबूक वर तब्बल 5अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे, 2017 साली झालेल्या केम्ब्रिज अनॅलिटीका डेटा लीक (Cambridge Analytica Data Leak) प्रकरणी हा निर्णय देण्यात आला आहे. जागतिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार एखाद्या टेक्नॉलजी कंपनीला लगावलेला हा आजवरचा सर्वात अधिक किमतीचा दंड आहे. युजर्सची वैयक्तिक माहिती त्यांच्या निरपेक्ष वापरल्याचा आरोपावरून हा मामला मागील वर्षीपासून सुरु होता अखेरीस आता फेडरल ट्रेड कमिशनने याबाबत असा निर्णय सुनावला आहे. Facebook चा नवीन सुरक्षा फंडा, Instagram, Messengerच्या नव्या रुपासोबत करण्यात येणार हे बदल
काय होतं डेटा लीक प्रकरण?
2017 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी केम्ब्रिज अनॅलिटीका ही कंपनी डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करत होती, त्याचाच भाग म्हणून त्यांनी फेसबुकवरील 8 कोटी युजर्सची माहिती अवैधरित्या प्राप्त केली होती, ही माहिती त्यांनी निवडणूक कार्यात वापरली असणार असा देखील काहींचा नादाज होता, यानुसार अमेरिकन व युरोपियन नेत्यांनी फेसबुक इंक कडे विचारणा सुद्धा केली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी फेडरल ट्रेंड कमिशन कडे सोपवण्यात आली होती, कमिशनच्या तपासात फेसबुकच्या हलगर्जीपणामुळे युजर्सच्या सुरक्षेला धक्का लागल्याचे उघड झाले आणि परिणामी 2018 मध्ये हे संपूर्ण डेटा लीक प्रकरण उघड झाले होते. Whatsapp वापरण्यासाठी प्रति महिना 499 रूपये भरावे लागणार? झपाट्याने व्हायरल होणार्या या मेसेजमागील जाणून घ्या सत्य!
फेसबुकला बसणार फटका?
वास्तविकता हे प्रकरण 2018 ला उघड झाले होते मात्र त्यांनतर अद्याप फेसबुक किंवा ट्रेंड कमिशन कडून याबाबत कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. असं असलं तरी फेसबुकचे मालक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना याप्रकरणी कारवाई होणार याची कल्पना होती त्यानुसार 3 अब्ज डॉलरची रक्कम सुरवातीलाच बाजूला करून ठेवण्यात आली होती, याशिवाय फेसबुकचा या वर्षातील व्यवसाय पाहिल्यास त्यांना अगोदरच 15 मिलियन डॉलर इतका नफा झाला आहे, त्यामुळे केवळ 5 अब्ज डॉलर ही काही फेसबुकसाठी मोठी रक्कम नाही.
दरम्यान, ही आजवरची सर्वात मोठी दंडाची रक्कम आहे, या आधी गुगल कंपनीला 2012 मध्ये 22 मिलियन डॉलर्सचा दंड आकारण्यात आला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)