Facebook कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभुमीर येत्या जुलै 2021 पर्यंत Work From Home करण्याची मुभा

सोशल मीडियातील प्रसिद्ध अशा फेसबुकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या परवानगीसह घरात ऑफिस संबंधित जरुरींसाठी 1000 डॉलर्स सुद्धा देणार आहे.

फेसबुक (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचे महासंकट पाहता फेसबुक (Facebook) कंपनीने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या जुलै 2021 पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) करण्याची मुभा दिली आहे. सोशल मीडियातील प्रसिद्ध अशा फेसबुकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या परवानगीसह घरात ऑफिस संबंधित जरुरींसाठी 1000 डॉलर्स सुद्धा देणार आहे. फेसबुक पूर्वी गुगलने सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना येत्या जून 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे.कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्याच्या प्रकरणी ट्विटरचा सुद्धा समावेश आहे. ट्विटरने कोरोना व्हायरसचे महासंकट टळे पर्यंत त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बड्या कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.

फेसबुकने असे म्हटले आहे की, सरकार आणि हेल्थ एक्सपर्ट्स यांच्या मार्गदर्शन सुचनांनुसार आम्ही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल चर्चा सुद्धा झाली त्यानंतरच कर्मचाऱ्यांना येत्या जुलै 2021 पर्यंत घरुन काम करण्याची परवानगी मान्य केली आहे.(Google चा मोठा निर्णय; कोरोना व्हायरसमुळे गुगलचे कर्मचारी जुलै 2021 पर्यंत करू शकतात Work From Home)

फेसबुकने घरातच ऑफिस संबंधित जरुरी गोष्टी करण्यासाठी कंपनी त्यासाठी पैसे देणार असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. फेसबुकने असे सांगितले की, सर्व कर्मचाऱ्यांना 1 हजार डॉलर्स देण्यात येणार आहेत. परंतु फेसबुक काही ठिकाणी मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार सरकारच्या मार्गदर्शन सुचनांनुसार ऑफिस ही सुरु ठेवणार आहे. तर कोरोनाचे ज्या ठिकाणी कमी रुग्ण आढळले आहेत तेथे ऑफिस सुरु करणार आहे. दरम्यान, कोरोना व्हायरचा प्रादुर्भावासह रुग्णांची संख्या वाढत असल्याने फेसबुकने युएस आणि लॅटिन अमेरिकेत या वर्षाच्या अखेर पर्यंत त्याचे ऑफिस सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.