Elon Musk 'Google Pay' प्रमाणे 'X' Pay पेमेंटचा पर्याय आणणार

'X' मध्ये पेमेंट पर्याय समाविष्ट करण्यासाठी परवान्याची प्रतीक्षा असल्याचंही त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं. मात्र, या फीचरसाठी 2024 च्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Elon-Musk | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Elon Musk Rollout X Pay: एलोन मस्क (Elon Musk) यांच्या मायक्रोब्लॉगिंग साइट 'X' संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. एलोन मस्क 2024 पर्यंत 'X' अॅपमध्ये अनेक बदल करणार आहेत. ते 'एक्स' अॅपचा कायापालट करण्याच्या विचारात आहे. ते 'एव्हरीथिंग अॅप' (Everything App) बनवण्यावर काम करत आहे. जेव्हा एलोन मस्कने हे व्यासपीठ ताब्यात घेतले तेव्हा ते मायक्रोब्लॉगिंग साइट म्हणून वापरले गेले. मस्क यांनी सांगितले की, ते यामध्ये क्रिप्टोकरन्सी समाविष्ट करणार आहेत. 'एक्स'मध्ये क्रिप्टोचा समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

तथापी, एका मुलाखतीत एलोन मस्क यांनी सांगितलं की, ते 'Google Pay' प्रमाणे 'X' Pay पेमेंटचा पर्याय आणणार आहेत. 'X' मध्ये पेमेंट पर्याय समाविष्ट करण्यासाठी परवान्याची प्रतीक्षा असल्याचंही त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं. मात्र, या फीचरसाठी 2024 च्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यासाठी आपल्याला खूप उशीर झाल्याचे मस्क यांनी सांगितले. परंतु, आतापर्यंत त्यांनी आपल्या प्लानसंदर्भात तपशील सांगण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा -Elon Musk यांच्या टेस्ला कारची भारतात लवकरच निर्मिती, PMO द्वारे सरकारी विभागांना विशेष निर्देश)

दरम्यान, मस्क यांच्या या घोषणेने क्रिप्टो सेक्टरमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या वर्षी कंपनीला र्‍होड आयलंड, मिशिगन, मिसूरी आणि न्यू हॅम्पशायर येथे चलन ट्रान्समीटर परवाने मिळाले. 2022 मध्ये, मस्कच्या कंपनीने लोकांना DOGE मध्ये पेमेंट करण्यास सांगितले होते. यानंतर क्रिप्टोकरन्सी DOGE ने मोठी झेप घेतली. (हेही वाचा - Elon Musk: Meta नंतर मस्कने Wikipedia सोबत घेतला पंगा; म्हणाले, नाव बदलले तर एक अब्ज डॉलर देईन)

याशिवाय, एप्रिलमध्ये मस्कने ज्यांना ट्विटर ब्लू सेवा वापरायची आहे त्यांच्यासाठी क्रिप्टोकरन्सी डोगेकॉइनचा पेमेंट पर्याय म्हणून वापर केला होता. तथापी, मस्कने अद्याप क्रिप्टोबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र, असे झाल्यास गुगल आणि अॅपलसाठी मोठा धक्का बसू शकतो. कारण ऍपल पे अमेरिका आणि कॅनडामध्ये वापरता येते. पण आता मस्क स्वतः या मार्केटमध्ये उतरणार आहेत. त्यामुळे एक्सची स्पर्धा थेट गुगल पे आणि अॅपलसोबत असणार आहे.