Articles Feature On X: एलोन मस्कने लाँच केलं आर्टिकल फीचर; जाणून घ्या ट्विटरवर 'कसे' लिहू शकाल Long Form Content
या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना ट्विटरवर लाँग-फॉर्म सामग्री शेअर करता येणार आहे. प्रीमियम X वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर स्टाइलिश मजकूर, प्रतिमा आणि व्हिडिओसह कन्टेंट शेअर करण्यास सक्षम असतील.
Articles Feature On X: एलोन मस्क (Elon Musk) ने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांसाठी एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे. X च्या प्रीमियम वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य 'आर्टिकल्स' (Articles) नावाने आणले गेले आहे. या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना ट्विटरवर लाँग-फॉर्म सामग्री (Long Form Content) शेअर करता येणार आहे. प्रीमियम X वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर स्टाइलिश मजकूर, प्रतिमा आणि व्हिडिओसह कन्टेंट शेअर करण्यास सक्षम असतील.
आर्टिकलमध्ये, वापरकर्ते मजकूरासह फोटो, व्हिडिओ, पोस्ट, GIF आणि लिंक शेअर करू शकतील. यासोबतच टेक्स्ट फॉरमॅटिंगसाठी यूजर्सना हेडिंग, सब-हेड, बोल्ड, इटॅलिक, बुलेट, नंबर आणि लिस्ट सारखे पर्यायही उपलब्ध असतील. (हेही वाचा - Elon Musk Files Case Against OpenAI: एलोन मस्क यांनी ओपनएआय विरुद्ध दाखल केला खटला; CEO Sam Altman वर केला करार मोडल्याचा आरोप)
नवीन वैशिष्ट्य सादर करताना, कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटलं आहे की, Articles हे X प्लॅटफॉर्मवर दीर्घ स्वरूपातील सामग्री सामायिक करण्याचा एक मार्ग आहे. Articles प्रकाशन वैशिष्ट्य सध्या प्रीमियम प्लस सदस्य आणि सत्यापित संस्थांसाठी उपलब्ध आहे. X चे हे फिचर जागतिक वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे. (हेही वाचा -Wireless Brain Chip In Human: एलॉन मस्कची कंपनी Neuralink चे मोठे यश, पहिल्यांदाच मानवी मेंदूमध्ये बसवली चिप; फक्त विचार करून करू शकाल कामे)
X वरील Articles वैशिष्ट्य कसे वापरावे?
- X वर लेख लिहिण्यासाठी वापरकर्त्यांना x.com उघडावे लागेल. येथे बाजूच्या मेनूमध्ये, तुम्हाला Articles टॅबमधील लेखन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आर्टिकल लिहिल्यानंतर तुम्हाला पब्लिश बटण दाबावे लागेल. यानंतर, हा लेख तुमच्या प्रोफाइलच्या आर्टिकल टॅबवर दिसेल.
- X वर प्रकाशित झालेल्या या आर्टिकलमध्ये वापरकर्ते बदलही करू शकतील. यासोबतच यूजर्स त्यांना हवे असल्यास ते काढून टाकू शकतील.
जेव्हापासून X ची कमान एलोन मस्क यांच्या हाती आली आहे, तेव्हापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक बदल घडत आहेत. नुकत्याच झालेल्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी X वरील आगामी बदलांबद्दल संकेत दिले.