Twitter Logo Changed: ट्विटरचे मालक एलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलला, ठेवला 'या' प्राण्याचा फोटो
आज सकाळी सकाळी जेव्हा अनेकांनी ट्विटर सुरु केले तेव्हा त्यांना आपल्या ट्विटरच्या अकाऊंटवर श्वानाचा फोटो पाहून आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यासारखे वाटले.
Twitter Logo Changed: ट्विटरचे मालकी हक्क जेव्हापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आले आहे तेव्हापासून त्यांने ट्विटरमध्ये (Twitter) मोठे बदलाव केले आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी या निर्णयाविरोधात नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता एलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलला आहे. आता प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो (Dog Logo) ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा बदल पाहून अनेक वापरकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी यावर आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.
पहा ट्विट -
आज सकाळी सकाळी जेव्हा अनेकांनी ट्विटर सुरु केले तेव्हा त्यांना आपल्या ट्विटरच्या अकाऊंटवर श्वानाचा फोटो पाहून आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यासारखे वाटले. नंतर स्वतः एलॉन मस्क यांनीच ट्विट करत माहिती दिल्याने हा संभ्रम संपला. एलॉन मस्कने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक मीम शेअर करत या निर्णयाची माहिती दिली आहे. यात श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसलेलं आहे आणि ते वाहतूक पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवत आहे. या ओळखपत्रात निळ्या चिमणीचा फोटो आहे. त्यावर हे श्वान वाहतूक पोलिसांना हा आपला जुना फोटो असल्याचं सांगत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)