Discoms Awareness Campaign: वीज बिल भरताना बँकेचे तपशील शेअर करू नका; फसवणुकीच्या वाढत्या घटनानंतर डिस्कॉम्सची जागरूकता मोहिम

वीज बिल भरण्यासाठी व्हेरिफाईड ॲप्सचा वापर करा. बिल भरण्याबाबत सुरक्षेचे सल्ले देण्यासाठी डिस्कॉम्सने जागरूकता मोहिम सुरू केली आहे. ज्यात वीज बिल कसे भरावे, कोणती काळजी घ्यावी. हे नमबद केले आहे.

Photo Credit- Pixabay

Discoms Awareness Campaign: दिल्लीतील फसवणुकीच्या वाढत्या संख्येवर नजर ठेवून डिस्कॉम्सने मीडिया जागरूकता मोहिम सुरू केली आहे. त्यात वीज बिल भरण्याबाबत काही सल्ले देण्यात आले आहेत. व्हेरिफाईड ॲप्सवर वीज बिल भरणे, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तपशील कुठेही देऊ नये. संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा असे सल्ले देण्यात आले आहेत.

हे घोटाळे एका शहरापुरते मर्यादित नाहीत. हे घोटाळेबाज सर्वत्र समान डावपेच वापरत आहेत. ते थकीत पेमेंटचा दावा करणारे मॅसेज पाठवतात आणि लोकांकडून संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यास किंवा अपरिचित नंबरवर कॉल करण्यास उद्युक्त करतात. या लिंक्स अनेकदा मालवेअर-ग्रस्त वेबसाइट्सकडे लोकांना नेतात. अलीकडेच दिल्लीतील एका डॉक्टरला याचा फटका बसला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याने वीज बिल भरण्यासाठी बनावट लिंकवर क्लिक केले आणि त्याची 6 लाख रुपयांची फसवणूक केली.

बीएसईएसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वीज बिल भरताना ग्राहकांनी सतर्क राहणे आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. केवळ बीएसईएस-अधिकृत प्लॅटफॉर्म वापरणे आवश्यक आहे. अधिकारी पुढे म्हणाले, “आमचे अधिकारी ग्राहकांना त्यांच्या बँक किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड तपशील, CVV क्रमांक किंवा OTP कधीही विचारणार नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement