D2h कंपनीने सादर केले आकर्षक ऑफर, दुसऱ्या ग्राहकांचा रिचार्ज केल्यावर कॅशबॅकचा लाभ घेता येणार

याच दरम्यान आता D2h सर्विस प्रोवाइडर्स कंपनीने सुद्धा एक नवी ऑफर आणली आहे.

प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य- Pixabay )

लॉकडाउनच्या संकटात काळात टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या युजर्ससाठी उत्तम सुविधा देण्याचा विचार केला आहे. याच दरम्यान आता D2h सर्विस प्रोवाइडर्स कंपनीने सुद्धा एक नवी ऑफर आणली आहे. त्यानुसार लॉकाउनच्या वेळी सेटअप बॉक्सच्या रिचार्जचे टेन्शन करणे दूर होणार आहे. यामध्ये D2h सुद्धा सहभागी झाले आहेत. डी2एचने 'Friends and Family Recharge' ऑफर आणली आहे. या ऑफरच्या अंतर्गत जर युजर्सने दुसऱ्यांचा रिचार्ज केल्यास त्यांना कॅशबॅकचा लाभ घेता येणार आहे.

फ्रेंड अॅन्ड फॅमिली रिचार्ज ऑफर बाबत बोलायचे झाल्यास याची घोषणा कंपनीने अधिकृत वेबसाईटवरून केली आहे. वेबसाईटवर स्पष्टपणे असे लिहिले आहे की, मित्रांचे किंवा परिवाराचे D2h चे रिचार्ज केल्यास तु्म्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. रिचार्जसाठी युजर्सला RTNs किंवा कस्टमर आयडीचा उपयोग करावा लागणार आहे. जर तुम्हाला एखाद्या मित्राचा रिचार्ज करायचा असल्यास तुम्ही डी2एचच्या वेबसाईटवर जाऊन मित्रांचा कस्टमर आयडी टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही सहज रिचार्ज करु शकतात. युजर्सला रिचार्ज केल्यानंतर 24 तासात बँक खात्यात कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात युजर्ससाठी ही ऑफर उपयोगी पडणार असल्याचे म्हटले जात आहे.(Amazon Pay Later: सामान खरेदी करताना पेमेंटची चिंता सोडा; अॅमेझॉनने सुरु केली नवी सुविधा, जाणून घ्या सविस्तर)

 दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी डी2एच कंपनीने त्यांच्या SD आणि HD सेटअप बॉक्सच्या किंमती कमी केल्या आहेत. एचडी आणि एसडी सेटअप बॉक्सची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एचडी सेटअप बॉक्स 1599 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर एसडी सेटअप बॉक्ससाठी 1499 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे.