WhatsApp च्या माध्यमातून 'या' पद्धतीने डाउनलोड करा तुमचे लसीकरणाचे सर्टिफिकेट

जर तुम्ही परदेशी किंवा देशाअंतर्गत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर कोरोनाचे सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. आतापर्यंत कोविड19 वरील लसीचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय आहेत.

WhatsApp च्या माध्यमातून 'या' पद्धतीने डाउनलोड करा तुमचे लसीकरणाचे सर्टिफिकेट
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

जर तुम्ही परदेशी किंवा देशाअंतर्गत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर कोरोनाचे सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. आतापर्यंत कोविड19 वरील लसीचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय आहेत. त्यामध्ये असे की, कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करा. भारत सरकारकडून आता सर्वांसाठी कोविड लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करणे ही प्रक्रिया अधिक सोप्पी केली आहे. त्यानुसार आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे.

तुम्ही MyGov कोरोना हेल्पडेस्क WhatsApp चॅटबॉट डाऊनलोड करु शकता. याची घोषणा भारत सरकारने गेल्या वर्षाच्या सुरुवातीला केली होती. जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला होता. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोविड19 लसीकरण सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करावे याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.(Rajasthan: धक्कादायक! कानात Bluetooth Earphone चा अचानक झाला स्फोट; 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

-सर्वात प्रथम तुम्ही MyGov Corona Helpdesk WhatsApp क्रमांक +91 9013151515 तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.

-फोन क्रमांक सेव्ह झाल्यानंतर व्हॉट्सअॅप सुरु करा.

-चॅट लिस्टमध्ये कॉन्टॅक सर्च करा.

-चॅट सुरु करा.

-देण्यात आलेल्या ठिकाणी Download Certificate टाइप करा.

-WhatsApp चॅटबॉट पुन्हा तुम्हाला रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवेल.

-OTP वेरिफाय करा आणि तो दाखल करा.

आता चॅटबॉट तुमचे कोविड19 चे लसीकरण सर्टिफिकेट तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवेल. त्यानंतर तुम्हाला  तुमचे लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे. जर चॅटबॉट सर्वर Error दाखवत  असेल तर तुम्हाला अधिकृत कोविन पोर्टवर किंवा आरोग्य सेतूच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल.

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2021 03:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).