Byju’s Financial Crisis: कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी बायजूचे संस्थापक रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण

या बदल्यात रवींद्रन यांच्या कंपनीने 12 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. मात्र, या कर्ज व्यवहाराचा खुलासा अद्याप झालेला नाही.

BYJU’S. (Photo Credits: Twitter)

भारतातील आघाडीची एडटेक फर्म बायजू सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून स्टार्टअप कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे उरले नाही आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची घरे गहाण ठेवली आहेत. बायजूच्या संस्थापकाने सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 100 कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी त्यांचे बेंगळूरु शहरातील दोन घर गहाण ठेवले आहेत. तसेच एक शहरात बनत असलेला बंगला देखील गहाण ठेवला असल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा - UPI Transactions in November: नोव्हेंबरमध्ये युपीआयचा नवा विक्रम; झाले 17.40 लाख कोटी रुपयांचे व्यवहार)

अहवालानुसार, बायजू रवींद्रन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची घरे गहाण ठेवली आहेत. गहाण ठेवलेल्या मालमत्तेमध्ये कुटुंबाची बेंगळुरूमधील दोन निवासस्थाने आहेत. या बदल्यात रवींद्रन यांच्या कंपनीने 12 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. मात्र, या कर्ज व्यवहाराचा खुलासा अद्याप झालेला नाही.

बायजू ही लहान मुलांसाठीची डिजिटल रीडिंग प्लॅटफॉर्म आहे. कंपनी सध्या आर्थिक अडचणीत असून तीला 400 मिलीयन डॉलरमध्ये विकण्याची प्रकिया सध्या सुरु आहे. तसेच कंपनी व्याजाच्या परताव्यामध्ये केलेल्या चुकीसाठी लेनेदारांसोबत कायेदशीर कारवाईमध्ये देखील फसली आहे.