Battlegrounds Mobile India गेम खेळण्यासाठी 'या' मोबाईल स्पेसिफिकेशन्सची गरज; जाणून घ्या सविस्तर
हा गेम लॉन्च होण्यापूर्वी Krafton ने त्यांच्या BGMI या बेवसाईटवर एक सपोर्ट पेज सुरु केले आहे.
पबजी मोबाईलचे (PUBG Mobile) भारतीय व्हर्जन बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India ) आज भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी Krafton ने त्यांच्या BGMI या बेवसाईटवर एक सपोर्ट पेज सुरु केले आहे. या पेजमध्ये गेम खेळण्यासाठी लागणारे कमीत कमी स्पेसिफिकेशन्स, डेटा ट्रान्सफर डिटेल्स आणि इतर बाबींबद्दल माहिती दिली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल... (Battlegrounds Mobile India चाहत्यांसाठी खूशखबर; बेटलग्राऊंड मोबाईल इंडिया Google Play Store वर Pre-Registered Users साठी उपलब्ध)
गेम खेळण्यासाठी लागणारे कमीत कमी स्पेसिफिकेशन्स:
# तुमच्या मोबाईलमध्ये अॅनरॉईड 5.1.1 किंवा त्यापेक्षा अधिकची ऑपरेटिंग सिस्टम असावी.
# तुमच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 2 जीबी रॅम असणे गरजेचे आहे.
# 1 जीबी रॅम असणाऱ्या Android Go वर हा गेम खेळता येणार नाही.
# गेमचे हायग्राफिक व्हर्जन खेळण्यासाठी तुम्हाला 2 जीबी पेक्षा अधिक रॅम लागेल.
# जर तुम्ही गेमचे अल्ट्रा एचडी आणि एचडीआर पर्याय निवडू इच्छिता तर 2 जीबी रॅम पुरेसा होणार नाही.
# हा गेम खेळण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये चांगला स्पीड असलेला प्रोसेसर असणे देखील गरजेचे आहे.
# हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4-5 mbps स्पीड असलेला इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
या गेमच्या उत्तम BGMI गेमिंग अनुभवासाठी अधिक रॅम असणे गरजेचे आहे. या गेममध्ये अनेक ग्राफिक सेटिंग्स दिल्या असून त्या अप्लाय करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अधिक रॅमची गरज आहे. रॅमसोबतच तुमच्या मोबाईलचा प्रोसेसर स्पीड सुद्धा चांगला असण्याची गरज आहे. मोबाईलचा प्रोसेसर स्पीड कमी असल्यास या गेमच्या टॉप फिचर्सचा तुम्ही आनंद घेऊ शकणार नाही.
सध्या बाजारात मिळणारे 20 हजारांच्या किंमतीचे मोबाईलमध्ये चांगला प्रोसेसर आणि रॅम असल्यामुळे तुम्ही हा गेम सहजरित्या खेळू शकाल. मोबाईलच्या स्पीडसोबतच इंटरनेट कनेक्शन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही BGMI च्या वेबसाईटवर इंटरनेट स्पीड तपासू शकाल. या मोबाईलचे बिटा व्हर्जन डाऊनलोडसाठी उपलब्ध असून फक्त प्री-रजिस्टर युजर्सच याचा लाभ घेऊ शकतात.