IBM to Pause Hiring: कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्यांसाठी आव्हान; IBM कडून नोकरभरतीसंदर्भात वेगळा विचार

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणजेच एआय (AI) आता जगभरातील विविध कंपन्यांमधील नोकऱ्यांसमोर नवे आव्हान आणि कर्मचाऱ्यांच्या काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये बदलाचे वारे घेऊन येताना दिसत आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्प (International Business Machines Corp) कंपनीने याबाबत सूतोवाच केले आहे.

Artificial Intelligence | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणजेच एआय (AI) आता जगभरातील विविध कंपन्यांमधील नोकऱ्यांसमोर नवे आव्हान आणि कर्मचाऱ्यांच्या काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये बदलाचे वारे घेऊन येताना दिसत आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्प (International Business Machines Corp) कंपनीने याबाबत सूतोवाच केले आहे. आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा ( Arvind Krishna) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आयबीएम (IBM) येत्या काळात नोकरभरतीला स्थगिती किंवा त्यात बदल करु शकते. कंपनीला वाटते की येत्या काही वर्षांमध्ये कंपनीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे अंदाजे 7,800 नोकऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो.

रॉयटर, ब्लूमबर्ग आणि मिंटसारख्या अनेक वृत्तसंस्था आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आगामी काळात खास करुन मानव संसाधान मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या क्षेत्रात जसे की, बँक, सेवा देणारी कार्यालये आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जाईल. ज्यामुळे गैर-ग्राहकमुखी क्षेत्रात सुमारे 30% किंवा त्याहूनही अधिक प्रमाणात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरली जाईल किंवा त्याचा प्रभाव असेल. (हेही वाचा, Morgan Stanley Layoffs: मार्गन स्टॅनली बँक पुन्हा करणार कर्मचारी कपात, 3000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ)

ट्विट

आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांची प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा ओपन एआय चे उत्पादन व्हायरल चॅटबॉट, ChatGPT लाँच झाले आणि त्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले.व्हायरल चॅटबॉट, ChatGPT लाँच केले आहे. IBM सध्या सुमारे 260,000 कामगारांना रोजगार देते. तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करते. पाठिमागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नाविन्यपूर्ण संकल्पना शोधणे अधिक सोपे आहे. परिणामी कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला नोकर कपातीची घोषणा केली. 2020 पासून सीईओ असलेल्या कृष्णा यांनी शतकानुशतके जुन्या कंपनीला हायब्रिड क्लाउड सारख्या सॉफ्टवेअर आणि सेवांवर लक्ष केंद्रित करण्याचे काम केले आहे. त्याने व्यवस्थापित पायाभूत सुविधा युनिट Kyndryl Inc. आणि वॉटसन हेल्थ व्यवसायाचा भाग यांसारखे कमी-वाढीचे व्यवसाय काढून टाकले आहेत. कंपनी सध्या आपले हवामान युनिट विकण्याचा विचार करत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now