2 एप्रिलपूर्वी गुगलवरील सर्व डेटा डाऊनलोड करा, बंद होणार Google Plus सेवा
जर तुम्ही गुगल प्लस (Google Pluse) ही सेवा वापरत असाल तर 2 एप्रिल पासून गुगल (Google) ही सेवा बंद करणार आहे.
जर तुम्ही गुगल प्लस (Google Pluse) ही सेवा वापरत असाल तर 2 एप्रिल पासून गुगल (Google) ही सेवा बंद करणार आहे. याबद्दल गुगल कडून प्रत्येक युजर्सला संबंधित पाठवण्यात येत आहे. या मेलद्वारे गुगलने युजर्सला असे सांगितले आहे की, गुगल प्लसवरील तुमचे अकाउंट डिलीट करण्यासोबत त्यावरील डेटासुद्धा डिलिट होणार आहे.
त्यामुळे गुगल प्लसवरील तुमचे फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा डिलिट केले जाणार आहे. जर तुम्ही कोणतेही व्हिडिओ अपलोड केले असल्यास ते तत्वरीत डाऊनलोड करा असे सांगण्यात आले आहे. गुगलवरील तुमचा हा डेटा 31 मार्चपूर्वी डाऊनलोड करण्यास गुगलने सांगितले आहे. मात्र गुगल ड्राइव्ह, गुगल फोटो आणि जीमेल सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे.(हेही वाचा-Google ने भारतात लॉन्च केल्या YouTube Music आणि YouTube Premium या नव्या सुविधा; आता जाहीरातींशिवाय घ्या गाण्यांचा आनंद)
गुगल प्लसवरील डेटा डाऊनलाऊ करण्यासाठी तुम्हाला Download Your Data वर जाऊन तुमचे अकाउंट साइन इन करा. तेथे तुम्हाला गुगल प्लसवरील डेटा पहिल्यापासून सिलेक्ट केलेला असणार आहे. अशा पद्धतीने पुढे येणाऱ्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गुगल प्लसवरील डेटा डाऊनलोड करु शकणार आहात.