Apple कंपनी 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च करणार Online Store; युजर्सला होणार फायदा
गेल्या काही काळापासून Apple भारतीय बाजारात त्यांचे ऑनलाईन स्टोर सुरु करण्याचा प्लॅन करत असल्याची चर्चा होती. तर आता भारतीय युजर्ससाठी एक खुशखबर आहे. कारण येत्या 23 सप्टेंबरला ऑनलाईन स्टोरेज सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे युजर्सला आता थर्ड पार्टी ऐवजी थेट कंपनीच्या स्टोर मधूनच डिवाइस खरेदी करता येणार आहे.
गेल्या काही काळापासून Apple भारतीय बाजारात त्यांचे ऑनलाईन स्टोर सुरु करण्याचा प्लॅन करत असल्याची चर्चा होती. तर आता भारतीय युजर्ससाठी एक खुशखबर आहे. कारण येत्या 23 सप्टेंबरला ऑनलाईन स्टोरेज सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे युजर्सला आता थर्ड पार्टी ऐवजी थेट कंपनीच्या स्टोर मधूनच डिवाइस खरेदी करता येणार आहे. भारतात आतापर्यंत अॅपलचे डिवाइसेस थर्ड पार्टी रिटेलर स्टोर्स आणि ऑनलाईन वेबसाईट्स Amazon आणि Flipkart येथून खरेदी करता येत होते.(Facebook Smart Glasses: फेसबूक EssilorLuxottica च्या मदतीने 2021 मध्ये लॉन्च करणार स्मार्ट ग्लासेस!)
पण आता Apple ने अधिकृत पद्धतीने घोषणा करत भारतात 23 सप्टेंबरला ऑनलाईन स्टोर लॉन्च केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जे पहिल्यांदाच देशभरातील ग्राहकांना अॅपलचे सर्व प्रोडक्ट डायरेक्ट उपलब्ध करुन देणार आहे. नवे ऑनलाईन स्टोअर ग्राहकांना जगभरातील अॅपल स्टोर सारखाच प्रिमियम अनुभव देणार आहे. जो ऑनलाईन टीमच्या सदस्यांकडून दिला जाणार आहे.
अॅपल स्टोरवर फक्त प्रोडक्ट्स खरेदीच नव्हे तर कंपनीचे स्पेशलिस्ट सुद्धा उपलब्ध असणार आहेत. हे स्पेशालिस्ट ग्राहकांना प्रोडक्ट खरेदीवेळी गाइड करणार आहेत. ग्राहकांना थेट Apple कडून गाइडंन्स मिळणार असून ते इंग्रजीत ऑनलाईन सपोर्ट आणि हिंदी व इंग्रजी फोनमध्ये सपोर्टचा समावेश आहे. म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन सपोर्टचा उपयोग करत असल्यास सर्व माहिती इंग्रजीमधून मिळणार आहे. तसेच फोन कॉलवर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत गाइडन्स करणार आहेत.(हार्ट रेट फिचरसह Honor Watch GS Pro, Honor Watch ES लॉन्च; जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)
कंपनीचे असे म्हणणे आहे की, ग्राहकांना ट्रेड-इन प्रोग्रामसह फायनेंशिअल ऑप्शन उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन स्टोअरवर युजर्सला आकर्षित डिस्काउंटसह AppleCare+ खरेदी करता येणार आहे. जे डिवाइससह मिळणाऱ्या तांत्रिक सपोर्ट वॉरंटी 2 वर्षापर्यंत एक्सपांड करता येणार आहे. कंपनीने त्यांच्या कस्टमर्ससाठी फेस्टिव्ह सीझनमध्ये खास ऑफर देणार असल्याची सुद्धा घोषणा केली आहे. ऑक्टोंबरमध्ये सुरु होणाऱ्या फेस्टिव्ह सीझनमध्ये विद्यार्थ्यांना Mac आणि iPad वर डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे. या व्यतिरिक्त फेस्टिव्ह सीझनमध्ये कंपनीच्या कोणतेही प्रोडक्ट निवडल्यास त्यावर तुमची सही सुद्धा तयार करता येणार आहे. प्रिंटची सुविधा इमोजी व्यतिरिक्त हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, कन्नड, मराठी, तमिळ आणि तेलगू मध्ये उपलब्ध होणार आहे. इनरगेविंग तु्म्हाला iPad आणि Apple Pencil वर ही उपलब्ध असणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)