iPhone युजर्स आता Facebook, WhatsApp वरुन कॉल करु शकणार नाहीत?

Apple कंपनी लवकरच आता त्यांच्या युजर्ससाठी फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) च्या माध्यमातून VoIP कॉल्स करणे बंद करणार आहे.

WhatsApp प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Apple कंपनी लवकरच आता त्यांच्या युजर्ससाठी फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) च्या माध्यमातून VoIP कॉल्स करणे बंद करणार आहे. युजर्स या अॅपच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्शनशिवाय दुसऱ्या युजर्सला कॉल करु शकणार नाहीत. याबद्दल अधिक माहिती एका मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, कॉलिंग फिचर्स असलेले अॅप फोनच्या एका विशिष्ट बाजूला डाऊनलोड झालेले दिसतात. जेणेकरुन अॅपमधील डेटा अधिक जलद गतीने काम करु शकतो.

अद्याप या फिचरबद्दल कोणतीही माहिती अॅपल कंपनी किंवा फेसबुक कडून देण्यात आलेली नाही. अॅपलने जर कॉल्स बंद केले तक फेसबुकला त्यांच्या अॅपचे नवे डिझाइन तयार करावे लागणार आहे. त्याचसोबत फेसबुक मॅसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतासह अन्य देशात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉलिंग फिचर्सचा उपयोग करुन एकमेकांशी संपर्क केला जातो.('कॉल ड्रॉप' च्या समस्येपासून तुम्ही त्रस्त आहात? 'या' पद्धतीने करा तक्रार)

VoIP म्हणजे Voice Over Internet Protocol याचा उपयोग टेलिफोनसाठी केला जातो. यामध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कची गरज भासत नाही. मात्र इंटरनेट सेवा सुरु असणे फार महत्वाचे असते. या सिस्टिमचा खरा उपयोग लांब अंतरावरील कॉलिंगसाठी केला जातो.