Apple iPhone 13: भारतामध्ये Amazon, Flipkart वर iPhone 13,iPhone 13 Mini उपलब्ध; Pro,Pro Max व्हेरिएंट्स Sold Out!

तर iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro max हे व्हेरिएंट सोल्ड आऊट आहेत. अमेझॉन इंडिया वर देखील Pro आणि Pro Max हे उपलब्ध नाहीत. iPhone 13 Mini आणि iPhone 13 विक्रीसाठी आहेत.

Apple iPhone 13 Mini, iPhone 13 (Photo Credits: Apple)

अ‍ॅपल  आयफोन 13 (Apple iPhone 13) आणि आयफोन 13 मिनी ( iPhone 13 Mini) आता भारतामध्येही विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon India) वर ते उपलब्ध आहेत. आयफोन 13 ची घोषणा अ‍ॅपलने मागील आठवड्यातच केली आहे. आता ग्राहकांना खरेदीसाठी तो भारता सोबतच कॅनडा, युके, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी मध्ये देखील उपलब्ध आहे. सध्या फ्लिपकार्ट वर केवळ आयफोन 13 उपलब्ध आहे. तर iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro max हे व्हेरिएंट सोल्ड आऊट आहेत. अमेझॉन इंडिया वर देखील Pro आणि Pro Max हे उपलब्ध नाहीत. iPhone 13 Mini आणि iPhone 13 विक्रीसाठी आहेत.

भारतामध्ये ज्यांनी आयफोन 13 च्या सीरीज ची प्री-ऑर्डर केली आहे त्यांना आजपासून डिलेव्हरी मिळण्यास सुरूवात होणार आहे. अ‍ॅपलच्या अथॉराईज्ड डिस्ट्रिब्युटर कडून आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनी च्या खरेदी मध्ये एचडीएफसी च्या कार्डस वर 6000 रूपयांची कॅशबॅक मिळणार आहे. नक्की वाचा:  iPhone 13 च्या प्री-बुकिंगवर Vodafone Idea देतेय स्पेशल डिल्स आणि कॅशबॅक.

iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max घेणार्‍यांना एचडीएफसी च्या कार्डस वर 5000 रूपयांची कॅशबॅक मिळणार आहे. फ्लिपकार्ट वर आयफोन 13 घेणार्‍यांना Axis Bank credit cards, वर 5% कॅशबॅक मिळणार आहे. एक्सचेंज डील मध्ये 15 हजारांचा फायदा मिळणार आहे.. तसेच Rs 3,757 चा प्रतिमहिना ईएमआय असणार आहे.

अमेझॉन इंडिया वर iPhone 13 Mini आणि iPhone 13 घेणार्‍यांना नो कॉस्ट इएमआय चा पर्याय मिळणार आहे. Rs 14,200 चं एक्सचें ज डील देखील मिळणार आहे.

Apple iPhone 13 Mini आणि iPhone 13 मध्ये A15 Bionic प्रोसेसर आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये सेन्सर शिफ्ट ओआयएस सह 12 MP वाइड-अँगल आणि 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये सिनेमॅटिक मोड, 5 जी सपोर्ट आणि कस्टमाईड डिझाइन केलेले अँटेना देखील मिळतात. आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीमध्ये 6.1 इंच आणि 5.4 इंच आकाराचे डिस्प्ले आहेत.

आयफोन 13 प्रो ग्रेफाइट, गोल्ड, सिल्व्हर आणि 'सिएरा ब्लू' कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये A15 बायोनिक चिपसेट बसवण्यात आले आहे, जो 50 टक्के वेगवान ग्राफिक्स देतो. आयफोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. डिस्प्ले 10 Hz ते 120 Hz पर्यंत व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह येतो.