Apple iMac 0.8-inch iPad Air जुलै महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता
अॅपल आयपॅड एअर 10.8 मध्ये एलजी डिस्प्ले, बीओटी टेक्नोलॉजी आणि शार्प सपोर्ट करते. ज्यामध्ये सिंगल रेडिएंट बीएलयू सप्लायर आहे.
मोबाईल आणि टेक्नोलॉजी विश्वात अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या Apple कंपनीचा iMac 0.8-inch iPad Air येत्या जुलै महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या माहितीवर जोर देत म्हटले आहे की, आयमॅक, आयपॅड आणि आयपॅड मिनी लॉन्च करण्यााबाबत Apple विचार करत आहे. डिजीटाइम्सच्या वृत्ताचा हवाला देत आयएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, नव्या लॉन्चिंग डिवाईसमध्ये 10.8 इंचाचा आयपॅड एअर आणि 23 इंचाचा आयपॅड प्रो लॉन्च होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार, 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या 10.2 इंचाच्या तुलनेत अॅपल 2020 आयपॅड एअर साईज 10.8 इंचांनी वाढू शकते. अॅपल आयपॅड एअर 10.8 मध्ये एलजी डिस्प्ले, बीओटी टेक्नोलॉजी आणि शार्प सपोर्ट करते. ज्यामध्ये सिंगल रेडिएंट बीएलयू सप्लायर आहे. (हेही वाचा, OnePlus 8 5G & OnePlus 8 Pro 5G Smartphones India Sale: 15 जून रोजी दुपारी 12 पासून सेलला सुरुवात; Amazon.in आणि OnePlus.in वर करता येणार खरेदी)
प्रसरारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे की, 1 जुलैपासून अॅपल आपले नवे उत्पादन बाजारात लॉन्च करेन. अशीही शक्यता आहे की, नवा आयमॅक डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2020 एक किंवा दोन आठवड्यांमध्येच ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल. विश्लेषक मिंग-ची कुओ यांनीही 2020 किंवा 2021 मध्ये 10.8-इंच आणि 8-इंच आयपॅड लॉन्च होण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, 2020 आयमॅक एप्रिल मध्ये 23 इंचाच्या डिस्प्ले सोबत रिडिजाइनही करण्यात आला होता.