Apple कंपनीचे दिवाळी गिफ्ट ऑफर, iPhone 11 खरेदीवर फ्री मिळणार 'हे' शानदार डिवाइस

iPhone 11 Pro (Photo Credits-Twitter)

Apple Store Online ने यंदाच्या दिवाळीसाठी भारतीयांकरिता एक खास ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना iPhone 11 च्या खरेदीवर अगदी फ्री मध्ये AirPods म्हणून दिवाळी गिफ्ट देणार आहेत. अॅप्पल कंपनीचे हा फेस्टिव्हल सीजन ऑफर 17 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. Apple AirPods मध्ये ऑल न्यू Apple H1 हेडफोन चिप आणि ऑप्टिकल सेंसरसह मोशन एक्सीलेरोमीटरचा वापर करण्यात आलेला आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2020: खुशखबर! iPhone 11 मिळणार आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीमध्ये; अ‍ॅमेझॉन देत आहे संधी)

Apple AirPods ची किंमत 14,900 रुपये आहे. तर Apple iPhone 11 च्या 64GB वेरियंटची किंमत 61,990 रुपये आहे. फोन 5802 रुपयांच्या मंथली EMI वर खरेदी करता येणार आहे. तर iPhone 11 Pro चा 64 जीबी वेरियंट 99,900 रुपयात उपलब्ध आहे. तर iPhone 11 Pro Max 64 जीबी ची किंमत 1,09,900 रुपये आहे.(Samsung ने लॉन्च केला नवा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

iPhone 11 मध्ये 6.1 इंचाचा लिक्विट रेटिना डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये अॅप्पल च्या नव्या A14 बायोनिक चिपचा वापर केला आहे.ती ऑपरेटिंग सिस्टिमसह लॉन्च केला आहे. iPhone 11 च्या कॅमेऱ्याच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये 12 च्या मुख्य कॅमेऱ्यासह 12MP सेकेंडरी अल्ट्रा वाइस सेंसर सुद्धा दिला गेला आहे. यामध्ये f/2.4 अपर्चर असणाऱ्या सेंसरचा वापर करण्यात आला आहे. ज्याचे फील्ड ऑफ व्यू 120 डिग्री आहे. फोनच्या रियक कॅमेऱ्यासाठी Smart HDR, इंप्रुव्ह नाइट मोड, इन्हांस्ड प्रोट्रेट मोड आणि 60fps सह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सुविधा मिळणार आहे.