सावधान! 'या' फोटोंवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, नाहीतर तुमचा मोबाईल हॅक होईल

जेव्हा तुम्ही मोबाईलवरुन कधी कोणत्याही सोशल मीडियावरील फोटो किंवा अन्य संकेतस्थळावरील फोटोवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

हॅकर्स युजर्स डेटा चोरी करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे गुगल प्रत्येक वेळी त्याच्या युजर्संना हॅकर्ससंबंधित सुचना देत असतो. तर गुगलने (Google) एका नवीन पद्धतीचे बग (BUG) शोधून काढले आहे. जेणेकरुन हॅकर्स त्याच्या माध्यमातून डेटा हॅक करु शकतो. मात्र जेव्हा तुम्ही मोबाईलवरुन कधी कोणत्याही सोशल मीडियावरील फोटो किंवा अन्य संकेतस्थळावरील फोटोवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. कारण हॅकर्स .PNG इमेज फॉर्मेट मधील फोटोंच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलचा डेटा चोरी करु शकतात.

मात्र सर्वच पीएनजी फाईल असुरक्षित आहे. मात्र हॅकर्स काहीना काही ट्रिक्स वापरुन तुमचा फोनमधील डेटा हॅक करु शकतात. पीएनजी इमेजमुळे अँन्ड्रॉईड 7.0 ते 9.0 मध्ये एक BUG येतो. गूगलने याबाबत आपल्या फेब्रुवारी महिन्यातील सिक्युरीटी पॅच मध्ये दिली आहे.

जर तुमच्या मोबाईलमध्ये हे बग येत असतील तर हॅकर्स विविध कोडच्या सहाय्याने होस्ट डिवाईसचा अॅक्सेस मिळवू शकतात. होस्ट डिवाईस म्हणजेच हॅकर्सकडून जे फोन हॅक केले जातात. त्याचसोबत तुम्ही या फोटोवर क्लिक केले असल्यास व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. (हेही वाचा-अश्लील फोटो blur ठेवणारं Instagram नवं 'सेन्सिटिव्ही स्क्रीन' फिचर सादर)

त्यामुळे तुमच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरुन मेसेज किंवा व्हॉट्रसअॅप मेसेज येईल. त्यामुळे अशा मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितले जाईल. त्याचसोबत लिंकसह एक फोटो येईल. तसेच लिंकवर क्लिक केल्यास मजेशीर फोटो आणि लिहिलेले दिसेल. काही वेळेस युजर्सकडून अशा पद्धतीचे मेसेज डिलिट करतात. मात्र तुम्ही जर या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा डेटा चोरी होण्याची शक्यता आहे.