Amazon Mi Days Sale: Xiaomi च्या स्मार्टफोन्स सह अॅनरॉईड टीव्ही वर मिळत आहे जबरदस्त सूट

हा सेल 30 जूनपर्यंत चालेल. या सेलअंतर्गत Mi आणि Redmi च्या फोन्सवर CitiBank कडून 5% कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

Amazon Mi Days Sale (Photo Credits: Amazon Official Site)

Xiaomi Mi Days सेलची सुरुवात Amazon वर 26 जूनपासून झाली आहे. हा सेल 30 जूनपर्यंत चालेल. या सेलअंतर्गत Mi आणि Redmi च्या फोन्सवर CitiBank कडून 5% कॅशबॅक ऑफर मिळत आहे. Mi Days Sale साठी Amazon ने CitiBank सोबत पार्टनरशिप केली आहे. यात क्रेडिट कार्ड होल्डर्संना 5% कॅशबॅक मिळत आहे. तर काही Xiaomi फोन्सवर एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या सेलअंतर्गत केवळ फोन्सवर नाही तर अॅनरॉईड टीव्ही आणि कंपनीच्या इतर एक्सेसरीजची देखील विक्री केली जात आहे. तर जाणून घेऊया काही खास ऑफर्स बद्दल:

Redmi 6A:

भारतात गेल्या वर्षी लॉन्च झालेला हा स्मार्टफोन सेलअंतर्गत 5,999 रुपयांना खरेदी करु शकाल. ही 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज मॉडलची किंमत आहे. यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडल 6499 रुपयांना खरेदी करु शकाल.

Redmi 6 Pro:

या सेलअंतर्गत Redmi 6 Pro हा स्मार्टफोन 9999 रुपयांना खरेदी करता येईल. या किंमतीत तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडल उपलब्ध होईल.

Xiaomi Mi A2:

Amazon या फोनवर 3000 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफर देत आहे. यात 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मॉडल 10,999 रुपयांना खरेदी करु शकाल. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडल सेलमध्ये 15,999 रुपयांना खरेदी करु शकाल.

Redmi Note 5 Pro:

या सेलअंतर्गत Amazon वर या फोनची किंमत 11,999 रुपये आहे. यात तुम्ही 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडल खरेदी करु शकता.

Redmi 6:

या सेलअंतर्गत या फोनच्या 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजची किंमत 6999 रुपये आहे. तर का 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडलची किंमत 7499 रुपये आहे. तसंच या सेलअंतर्गत Redmi 7 आणि Redmi Y3 यांची किंमत अनुक्रमे 7,999 आणि 9,999 रुपये आहे.

इतर एक्सेसरीज:

Mi स्पोर्ट्स ब्लूटूथ वायरलेस इअरफोन्स 1499 रुपयांना उपलब्ध आहेत.

Mi पावरबँक्स 899 रुपयांना मिळत आहे.

TV:

Mi LED TV 4C PRO 80 cm (32) HD रेडी अॅनरॉईड टीव्ही (ब्लॅक) 12,999 रुपयांना मिळत आहे.

Mi LED TV 4A PRO 123.2 cm (49) फुल एचडी अॅनरॉईड टीव्ही (ब्लॅक) 29,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Mi LED TV 4 PRO 138.88 cm (55) अल्ट्रा एचडी अॅनरॉईड टीव्ही (ब्लॅक) 47,999 रुपयांना मिळत आहे.