Amazon Great Republic Day Sale: अॅमेझॉनचा नव्या वर्षातील पहिला बंपर सेल; जाणून घ्या सेलची Date, Duration आणि Offer

१५ जानेवारी ते २० जानेवरी २०२३ दरम्यान म्हणजे एकुण सहा दिवसांच्या रिपब्लिक डे सेलची घोषणा अॅमेझॉनकडून करण्यात आली आहे.

Amazon | (Photo Credits: Amazon)

२०२३ या नव्या वर्षातील पहिल्याचं बिग बंपर सेलची घोषणा अमेझॉनकडून करण्यात आली आहे. तरी तुम्ही बजेट ऑनलाईन शॉपिंग करायच्या विचारात असल्यास हा सेल तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तरी अमेझॉनच्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, कपडे, फर्निचर, फुटवेअर, ज्वेलरी, वॉचेस सारख्या वस्तुंवर मोठी सुट मिळणार आहे. १५ जानेवारी  ते २० जानेवरी २०२३ दरम्यान म्हणजे एकुण सहा दिवसांच्या रिपब्लिक डे सेलची घोषणा अमेझॉनकडून करण्यात आली आहे. तरी प्राइम यूजर्ससाठी हा सेल १४ जानेवारी म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये SBI कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे. अमेझॉन Apple, OnePlus, Redmi, Poco, Samsung आणि इतर अनेक फोनवर मोठ्या सवलती देणार आहे.

 

वर्षभरात विविध सेलची घोषणा (Sale Announcement) अॅमेझॉन (Amazon) कडून केली जात असली तरी वर्षातील हा सर्वात मोठा सेल (Sale) असतो. या सेल दरम्यान 50 टक्क्यांहून अधिकची सूट दिली जाते. तरी एसबीआय बॅंकच्या (SBI) डेबिट कार्डसह (Debit Card) क्रेडीट कार्ड (Credit Card) धारकांना विशेष सुट (Offer) मिळणार आहे. तरी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करण्याच्या मूडमध्ये असाल तर हो हा सेल तुमच्यासाठी आहे. (हे ही वाचा:-WhatsApp Update: व्हॉट्सअॅप घेवून येतोय नवा फिचर! व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी स्टेटस संबंधित भन्नाट अपडेट)

 

या सेलमध्ये अॅमेझॉनकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic Gadgets), घरगूती वस्तू (Home Shopping), फर्निचर (Furniture), कपडे (Clothes), खेळणी (toys), पुस्तक (Books) यांवर विशेष सूट देण्यात येणार आहे. तसेच तुम्ही टीव्ही (Television), फ्रीज (Fridge), मायक्रोवेव (Microwave), एसी (AC), वॉशिंग मशिन (Washing Machin) घेण्याच्या विचारात असाल तर हा अमेझोनचा सेल तुमच्यासाठी आहे. कारण इलेक्ट्रॉनिक (Electronics) वस्तूवरील 50 टक्क्याहून अधिक सूट (Discount) असल्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे. तरी 15  तारखेपासून सुरु होणाऱ्या या सेलबाबत (Sale) ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करणाऱ्यांमध्ये मोठी उत्सूकता दिसून येत आहे.