Amazon Fab Phone Fest उद्यापासून सुरु; 'या' स्मार्टफोन्सवर मिळेल जबरदस्त डिस्काऊंट

ई कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी Fab Phone Fest चे आयोजन केले आहे. 10 ते 13 जून दरम्यान हा सेल असेल.

Amazon Fab Phones Fest (Photo Credits: Amazon)

ई कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने (Amazon) आपल्या ग्राहकांसाठी Fab Phone Fest चे आयोजन केले आहे. 10 ते 13 जून दरम्यान हा सेल असेल. या सेलमध्ये OnePlus 6T, iPhone X, Samsung Galaxy M30 यांच्यासह अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट मिळेल. या सोबतच युजर्संना नो कॉस्ट EMI, एक्सचेंज, कॅशबॅक इत्यादी ऑफर्स दिल्या जातील. Amazon Fab Phone Fest मध्ये यंदा लॉन्च करण्यात आलेल्या प्रिमियम स्मार्टफोन्सवरसह अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर्स मिळतील.

Samsung Galaxy M20, Honor 9N, Redmi 7 यांसारख्या बजेट स्मार्टफोन्स शिवाय अनेक मोबाईल एक्सेसरीजवर देखील डिस्काऊंट ऑफर दिल्या जातील. या सेलमध्ये OnePlus 6T चे 8GB+128GB स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत सर्वात कमी किंमतीत म्हणजेच 27,999 रुपयांना विकले जावू शकतील. याची किंमत खरंतर 32,999 रुपये आहे.

या वर्षात लॉन्च झालेले Samsung चे बजेट स्मार्टफोन्स Galaxy M30 वर नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. Galaxy M30 ची किंमत 14,990 रुपये असून फोनमध्ये स्टोरेजचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे 4GB+64GB आणि दुसरा 6GB+128GB. याच्या 6GB+128GB वेरिएंटची किंमत 17,990 रुपये आहे.

त्याचबरोबर iPhone X मध्येही तुम्हाला सूट मिळू शकते. तर Samsung Galaxy M20 वर एक्सचेंज आणि डिस्काऊंट ऑफर दिली जाईल. Honor 9N, Vivo Y91i, Redmi 6A, Mi A2 4GB, Redmi 7 आणि Oppo A5 यांसारख्या बजेट स्मार्टफोन्सवरही सूट मिळेल. तसंच Galaxy Note 9, Vivo Nex, Huawei P30 Pro आणि Oppo R17 या स्मार्टफोन्सवर देखील सूट मिळेल. याशिवाय एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ मिळेल.

Nokia 8.1, Honor View 20, Vivo V15 Pro आणि Oppo F11 Pro या स्मार्टफोन्सवर देखील नो-कॉस्ट EMI ऑफर मिळेल. स्मार्टफोन्स व्यतिरिक्त मोबाईल एक्सेसरीज म्हणजेच हेडफोन्स, ब्लूटुथ, वियरेबल बँड्स इत्यादींवर देखील डिस्काऊंट ऑफर मिळेल. त्याचबरोबर बेस्ट डिल्सचा पर्याय देखील दिला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now