Amazon Christmas 2020 Sale Offers: ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर OnePlus8T 5G, Redmi Note 9 Pro, Mi Band 5 सह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स, डिस्काऊंट

सध्या कंपनीकडून स्मार्टफोनवर 40% तर लॅपटॉप्सवर 30% सूट जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

ख्रिसमस आता अगदी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. आता सणासुदीचा काळ झाला म्हणजे गिफ्ट्स आली, नव्या वस्तूंची खरेदी होतेच. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता ई प्लॅटफॉर्म साईट्सवर देखील अनेक ऑफर्सचा धमाका सुरू झाला आहे. अमेझॉनवर देखील आता नवा सेल सुरू झाला आहे. अमेझॉन ख्रिसमस सेल सुरू झाला आहे. त्यामुळे वेबसाईट्सवर ऑफर्स, डिस्काऊंट यांचा भडिमार सुरू झाला आहे. Year Ender 2020: भारतीय बाजारात 2020 वर्षात धुमाकूळ घातलेले 'हे' होते सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स.

अमेझॉनवर सध्या फॅशन, ब्युटी प्रोडक्स पासून ख्रिसमस डेकॉर, गिफ्ट सेट्स, पार्टीच्या वस्तू पासून स्मार्ट फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्यावर ऑफर्स आहेत. सध्या कंपनीकडून स्मार्टफोनवर 40% तर लॅपटॉप्सवर 30% सूट जाहीर करण्यात आली आहे. मग पहा त्यापैकीच काही स्पेशल ऑफर्स

स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉपवरदेखील Amazon Christmas 2020 sale मध्ये अनेक ऑफर्स आहेत. HP Pavilion gaming (DK0268TX) या सेलमध्ये Rs 63,990 या डिसकाऊंटेड सेलमध्ये उपलब्ध आहेत. Dell G3 आणि 2-in-1 HP Pavilion x360 लॅपटॉप्स हे अनुक्रमे Rs. 72,990 आणि Rs. 74,990 ला उपलब्ध असतील.

Mi Band 5 हा अमेझॉनवर 2499 रूपयांना उपलब्ध आहे. हा फिटनेस बॅन्ड 1.79 cm full AMOLED display, मॅग्नेटीक चार्जिंगसह आणि 11 विविध स्पोर्ट्स मोडवर उपलब्ध आहे.