एअरटेल ग्राहकांसाठी खुशखबर! Voice over Wi Fi च्या साहाय्याने नेटवर्कशिवाय करता येणार कॉल

कारण, युजर्सना वायफायच्या मदतीने कॉल करता येणार आहे. एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी ही खूशखबर आणली आहे.

Airtel (Photo Credits: File Photo)

आता युजर्सना मोबाईलमध्ये नेटवर्क नसतानाही कॉल करणं शक्य होणार आहे. कारण, युजर्सना वायफायच्या मदतीने कॉल करता येणार आहे. एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी ही खूशखबर आणली आहे. त्यामुळे एअरटेल ग्राहकांना आता सेल्युलर नेटवर्कशिवाय कॉल करता येणार आहे. ET टेलिकॉमने दिलेल्या माहितीनुसार, एअरटेलने भारतात वेगवेगळ्या लोकेशनवर Voice over Wi Fi (VoWo-Fi) ची चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे एअरटेल ग्राहकांना आपल्या फोनमध्ये सेल्युलर नेटवर्क नसल्यासही कॉल करता येणार आहे. डिसेंबर महिन्यात एअरटेल ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - आता Federal बँकेत रोबो घेणार इंटरव्ह्यू; जाणून घ्या 'कशी' असेल मुलाखत प्रक्रिया)

यासाठी एअरटेलकडून लोकेशनवर VoWi-Fi चाचणी सुरु केली जात आहे. लवकरच सर्व एअरटेल ग्राहकांना ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, Airtel ची VoWi-Fi सेवा सध्या Samsung Galaxy Note 10 सारख्या फोनसाठी उपलब्ध आहे. तुम्हालाही ही सेवा आपल्या मोबाईल फोनमध्ये सुरू करायची असेल तर, आपल्या कॉल सेटिंग मेन्यूमध्ये जा. त्यात 'वायफाय कॉलिग'चा पर्याय असेल तो ऑन करा. त्यामुळे तुमच्या फोनचे नेटवर्क स्लो असल्यास वायफाय अॅक्टिवेट होईल. परंतु, यासाठी तुमच्या जवळपास वायफाय नेटवर्क अॅक्टिव असणं आवश्यक आहे.

हेही वाचा - व्होडाफोन-आयडियाच्या स्थितीमुळे कुमारमंगलम बिर्ला यांच्या संपत्तीत 22 हजार कोटी रुपयांची घट

सध्या आपल्या मोबाईलमध्ये सेल्युलर नेटवर्क नसले तरी VoWi-Fi कॉलिंगच्या साहाय्याने व्हॉटसअॅप, मेसेंजरप्रमाणे कॉलिंग होते. यासाठी कोणत्याही अॅपची गरज लागत नाही. विशेष म्हणजे एअरटेल ग्राहकांना VoWi-Fi सुविधेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. तसेच नेटवर्क नसतानाही एअरटेल ग्राहकांना VoWi-Fi च्या साहाय्याने कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.