IPL Auction 2025 Live

Airtel कंपनीने आणला नवा प्रीपेड डेटा प्लॅन, युजर्सला फ्री मिळणार Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन

त्यानुसार युजर्सला या प्लॅनमध्ये डेटासह डिज्नी प्ल हॉटस्टार VIP चे सब्सक्रिप्शन सुद्धा एका वर्षासाठी फ्री देण्यात येणार आहे.

Bharti Airtel. (Photo Credits: Twitter)

टेलिकॉम कंपनी एअरटेलने (Airtel)  त्यांच्या युजर्ससाठी एक धमाकेदार नवी प्रीपेड डेटा प्लॅन रोलआउट केला आहे. त्यानुसार युजर्सला या प्लॅनमध्ये डेटासह डिज्नी प्ल हॉटस्टार VIP चे सब्सक्रिप्शन सुद्धा एका वर्षासाठी फ्री देण्यात येणार आहे. या डेटा प्लॅनमध्ये 3GB मिळणार असून 28 दिवसांची वॅलिडिटी आहे. एअरटेल 249 रुपयांचा अजून एका डेटा प्लॅन ऑफर करत आहे. त्यामध्ये ग्राहकांना प्रतिदिन 2 जीबी डेटासह ग्राहकांना 28 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइमचे मेंबरशिप सुद्धा मिळणार आहे. एअरटेल कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी प्रत्येक वेळी नवे प्लॅन्स लॉन्च करतात.

एअरटेल कंपनीच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये Zee5 Premium चे सब्सक्रिप्शन आणि एअरटेल xStream चे सुद्धा अॅक्सेस देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी एअरटेलने असे म्हटले होते की, ग्राहकांना त्यांची वॅलिडिटी वाढवता येत नाही आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात इनकमिंग कॉल्सची सुविधा देण्यात येणार आहे. कंपनी त्यांच्या सब्सक्राइबर्सला आणि त्यांच्या नजीकच्या लोकांसाठी ऑनलाईन पद्धतीने रिचार्ज करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. (Vodafone चे तीन डबल डेटा प्लॅन्स; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स)

एअरटेलने एका विधानात असे म्हटले आहे की, ग्राहक काही चॅनल्सच्या माध्यमातून रिचार्जची सुविधा उपलब्ध करुन घेऊ शकतात. यामध्ये एटीएम, पोस्ट ऑफिस, ग्रोसरी स्टोर्स आणि मेडिकल शॉप यांचा समावेश आहे. आतापर्यंत 3 कोटी ग्राहकांना त्यांचे प्रीपेड रिचार्ज करु शकत नाहीत आहे. तर एअरटेलसह अन्य टेलिकॉम कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या ग्राहकांच्या वॅलिडिटीत वाढ करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कंपनीचा 19 रुपयांचा 2 दिवसांच्या वॅलिडिटीचा प्लॅन आहे. त्यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. तसेच 200MB डेटा सुद्धा देण्यात येत आहे.  एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लॅनची 28 दिवसांची वॅलिडिटी असून त्यामध्ये युजर्सला 300 SMS आणि 2GB डेटा दिला जाणार आहे.