Airtel ने लॉन्च केले Safe Pay फिचर, डिजिटल पेमेंट होणार अधिक सुरक्षित

त्यामुळे आता डिजिटल पेमेंट करणे अधिक सुरक्षित असणार आहे. या नव्या फिचरमुळे डिजिट पेमेंटच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही कमी होणार आहे.

Airtel (Photo Credits: File Image)

एअरटेल (Airtel) कंपनीकडून Safe Pay फिचर लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे आता डिजिटल पेमेंट करणे अधिक सुरक्षित असणार आहे. या नव्या फिचरमुळे डिजिट पेमेंटच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही कमी होणार आहे. एअरटेलच्या युजर्सने असे म्हटले की, एअरटेल पेमेंट बँकेच्या माध्यमतून UPI किंवा नेट बँकिंग पेमेंट केल्यास अधिक सुरक्षित असणार आहे. कारण येथे स्टँडर्ड टू स्टेप वेरिफिकेशनचे ऑप्शन मिळणार आहे.(Privacy Policy संदर्भातील भारताच्या प्रश्नांवर WhatsApp ने दिले स्पष्टीकरण- 'पारदर्शकता आणणे हे आमचे उद्दीष्ट')

एअरटेल सेफ पे फिचर वापरण्यासाठी सर्वात प्रथम Airtel Thanks अॅप फोनमध्ये डाउनलोड करुन सुरु करावा लागणार आहे. तेथेच खाली असलेल्या बँकिंग सेक्शनवर क्लिक करा. आता Safe Pay वर क्लिक करा. Toggle बटणावर टॅप करुन इनबिल्ड करता येणार आहे. त्यानंतर UPI आणि नेट बँकिंग तपासून पहायता येणार आहे. आता Airtel Safe Pay इनबिल्ड केल्यानंतर Safe Pay अॅक्टिव्ह केल्यानंतर टॉप कार्ड मिळणार आहे.

जर तुम्ही Airtel पेमेंट बँकेच्या UPI मधून पेमेंट करणार असल्यास 4 डिजिट Mpin द्यावा लागणार आहे. त्यानंतरच पेमेंट पूर्ण होणार आहे. Airtel Safe Pay इनबिल्ड करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. यासाठी पेमेंट ट्राजेक्शनला स्विकरता येणार आहे.(NetFlix ने नववर्षाच्या सुरुवातीला केली मोठी घोषणा! दर आठवड्याला प्रदर्शित करणार नवीन चित्रपट, वाचा सविस्तर)

Airtel प्रमाणेच गुगलने सुद्धा आपल्या प्रायव्हसी अधिक सुरक्षित करण्याचे जाहीर केले आहे. Google ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये असे म्हटले की, त्यांचे लेटेस्ट वर्जन Chrome 88  मध्ये काही नवे फिचर्स दिले जाणार आहेत. यामध्ये युजर्सच्या प्रायव्हसी अधिक महत्वाची असणार आहे.  गुगल क्रोमच्या नव्या प्रायव्हसी फिचर्समुळे युजर्सला अधिक मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी विविध ऑप्शन मिळणार आहे. त्याचसोबत गुगल क्रोमकडून मजबूत पासवर्ड नसल्यास अलर्ट केले जाणार आहे.