Google Blue Tick: Twitter, Facebook नंतर आता Google वरही मिळणार ब्लू टिक; युजर्सला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सुरू करण्यात आली नवीन सेवा
ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामनंतर आता दिग्गज टेक कंपनी गुगलही आपल्या वापरकर्त्यांना ब्लू टिक देणार आहे. जेणेकरून लोकांना फसवणूक मेल आयडीवरून नव्हे तर योग्य वापरकर्त्याकडून मेल येत आहेत हे सहज ओळखता येईल. यामुळे लोकांची फसवणूक टाळता येणार आहे.
Google Blue Tick: ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) नंतर आता दिग्गज टेक कंपनी गुगलही आपल्या वापरकर्त्यांना ब्लू टिक (Blue Tick) देणार आहे. जेणेकरून लोकांना फसवणूक मेल आयडीवरून नव्हे तर योग्य वापरकर्त्याकडून मेल येत आहेत हे सहज ओळखता येईल. यामुळे लोकांची फसवणूक टाळता येणार आहे. Google ने सांगितले की, हे वैशिष्ट्य आणले गेले आहे आणि ते Google Workspace, G Suite Basic आणि Business च्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय वैयक्तिक गुगल खातेधारकांनाही ही सेवा दिली जात आहे.
काय आहे BIMI फीचर -
Google ने 2021 मध्ये प्रथमच Gmail मध्ये ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन (BIMI) सादर केले. या फीचरद्वारे ईमेल पाठवणाऱ्याचा ब्रँड लोगोही त्याच्या ईमेलसोबत दिसतो. गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने हे BIMI वैशिष्ट्य आणखी चांगले केले आहे. त्यानंतर ग्राहकांना पाठवणाऱ्याच्या ईमेलमध्ये BIMI स्वीकारत असलेल्या नावासह एक चेकमार्क दिसेल. याद्वारे, ग्राहकांना सत्यापित प्रेषकाने कोणता ईमेल पाठवला आहे हे जाणून घेता येईल. (हेही वाचा - World Password Day: जागतिक पासवर्ड दिन नमित्त Google ने आणली Passkeys प्रणाली; घ्या जाणून)
या सेवेमुळे लोकांची फसवणूक टाळता येणार -
टेक कंपनी Google ने म्हटले आहे की, मजबूत ईमेल पडताळणी ग्राहकांना आणि ईमेल सुरक्षा प्रणालींना स्पॅम ओळखण्यास आणि प्रतिबंध करण्यास मदत करते. तसेच ईमेल प्रेषकांना त्यांचा ब्रँड विश्वास वाढवण्याची संधी देते. यामुळे ईमेलच्या स्त्रोतावरील विश्वास वाढतो आणि प्रत्येकासाठी एक चांगली ईमेल इकोसिस्टम तयार होते.
Google ने आपल्या वापरकर्त्यांना ब्लू चेकमार्क देण्याच्या काही काळापूर्वी, ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क यांनी प्लॅटफॉर्मवरून लोकांचे ब्लूज बॅज काढून टाकले. मस्कने लोकांचे मोफत ब्लू टिक्स फीचर काढून घेतलं आहे. आता ट्विटरवर ज्या लोकांना ब्लू टिक्स हवी आहेत, त्यांच्यासाठी ट्विटरकडून दरमहा 900 रुपये आणि गोल्ड टिक्ससाठी संस्थांकडून 1000 रुपये शुल्क आकारले जात आहेत.
मेटाने इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही ब्लू टिक सेवा सुरू केली आहे. यासाठी मेटा वेबवर दरमहा 11.99 डॉलर आणि मोबाइलवर 14.99 डॉलर प्रति महिना घेत आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केले की, मेटा व्हेरिफाईड खाते वापरकर्त्यांना सत्यापित बॅज, प्लॅटफॉर्मवर वाढलेली दृश्यमानता, प्राधान्य ग्राहक समर्थन आणि बरेच काही प्रदान करेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)